प्रसिद्ध गायक लकी अली यांचे निधन? जवळची मैत्रीण आणि अभिनेत्रीने दिले स्पष्टीकरण

Death Rumours of Singer Lucky Ali Nafisa Ali Claims He Is Alive And All Well


कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात आपले पाय पसारले आहेत. भारतातही याची दुसरी लाट आली आहे. अशामध्ये अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले आहे. असेच काहीसे चित्रपटसृष्टीबाबतही आहे. कोरोना व्हायरसमुळे अनेक दिग्गज कलाकारांनी आपला जीव गमावल्याचे वृत्त येत आहे. परंतु यादरम्यान काही कलाकारांच्या मृत्यूच्या बातमीच्या अफवाही पसरल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीच्या निधनाच्या अफवेने सर्वांनाच धक्का दिला होता. यानंतर अभिनेत्रीला स्वत: पुढे येऊन खरे काय ते सांगावे लागले होते. असेच काही प्रसिद्ध गायक लकी अलीबाबतही झाले. मंगळवारी (४ मे) अचानक लकी अलीच्या निधनाच्या अफवांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. यामुळे त्यांचे चाहते घाबरले होते. अनेकांनी त्यांना श्रद्धांजलीही वाहिली. परंतु आता त्यांच्या जवळच्या एका व्यक्तीने ट्वीट केल्यानंतर चाहत्यांच्या जीवात जीव आला.

फार्महाऊसवर चांगला वेळ घालवत आहेत लकी अली
लकी अली यांची मैत्रीण आणि अभिनेत्री नफीसा अलीने ट्वीट करून स्पष्ट केले की, लकी अली एकदम ठणठणीत आहेत. सोबतच त्यांनी हेही सांगितले की, ते बंगळुरू येथील आपल्या फार्महाऊसवर आहे. दीर्घ काळापासून ते लाईमलाईटपासून दूर आहेत आणि आपला सर्वाधिक वेळ आपल्या फार्महाऊसवर घालवत आहेत. या भयानक व्हायरसमुळे ते खूप कमी कार्यक्रम करताना दिसतात.

एकदम ठणठणीत आहेत लकी
ई टाईम्सशी बोलताना नफीसा यांनी सांगितले की, ‘लकी बंगळुरू येथील आपल्या फार्महाऊसवर आपल्या कुटुंबासोबत आहेत. ते लवकरच एक कॉन्सर्ट करण्याची योजना करत आहेत. मंगळवारी त्यांच्याशी चर्चा केली आहे. ते एकदम ठणठणीत आहेत.’ पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, ‘चाहत्यांना काळजी करण्याची काहीही गरज नाही, कारण लकी अली फिट आणि फाईन आहेत.’

गोव्यातील व्हिडिओ झाले होते व्हायरल
मागील काही दिवसांमध्ये लकी अली यांचे काही व्हिडिओ जबरदस्त व्हायरल झालेे होते. यामध्ये ते गोव्यातील लोकांसमोर परफॉर्म करताना दिसले होते. ते आपलेच हिट गाणे गात होते. यादरम्यानचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.

लकी यांचे गाणे आहेत खूपच प्रसिद्ध
खरं तर लकी यांनी नव्वदच्या दशकात अनेक पॉप गाणी गायली आहेत. त्यांनी भारतात पॉप म्युझिक कल्चरला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांचे गाणे त्याकाळी सर्वांच्या प्लेलिस्टमध्ये असायचे. लकी अली एक प्रसिद्ध अभिनेते आणि कॉमेडियन महमूद यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या गाण्यांमध्ये ‘ओ सनम’, ‘मौसम’, ‘जाने क्या ढूँडता है’ या प्रसिद्ध गाण्यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त लकी यांनी ‘सूर’ या चित्रपटातही काम केले आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.