नवीन वर्ष सुरु झाले आणि गत वर्षाचा मागोवा घेण्यास सुरुवात झाले. सिनेसृष्टीसाठी २०२२ हे वर्ष संमिश्र असले तरी कलाकारांसाठी मात्र चांगले होते. यावर्षत अनेक मोठ्या कलाकारांनी लगीनगाठ बांधली, काही कलाकार आईबाबा झाले. अशीच मनोरंजनविश्वातील एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय जोडी असलेल्या गुरमीत आणि देबिनासाठी तर २०२२ हे वर्ष आयुष्यातील सर्वात मोठा आनंद देणारे ठरले. या वर्षात ते दोघं दोन मुलींचे आई बाबा झाले. गुरमीत आणि देबिना मुलींच्या जन्मानंतर सतत या ना त्या कारणावरून लाइमलाईट्मधे येत आहेत.
View this post on Instagram
गुरमीत आणि देबीनाने नुकतेच त्यांच्या दुसऱ्या मुलीचे नाव जाहीर केले आहे. काही महिन्यांपूर्वी देबीनाने त्यांच्या दुसऱ्या मुलीला जन्म दिला आता या मुलीचे नाव समोर आले आहे. गुरमीत आणि देबीनाने सोशल मीडिया अकाऊंटवरून एक फोटो शेअर करत मुलीचे नाव सांगितले आहे. त्यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलीचे नाव ‘दिविशा’ असे ठेवले असून, या नांवासोबतच त्यांनी या नावाचा अर्थ देखील सांगितला आहे. गुरमीत आणि देबिना गोव्याला सुट्ट्यांसाठी गेले असून, समुद्रकिनारी असलेल्या एका सेटिंग एरियामध्ये बसलेले दिसत असून, त्या दोघांनी त्यांच्या लहान मुलीला उचलून घेतलेले दिसत आहे. त्यात वर ‘दिविशा’ असे नाव लिहिले आहे. हा फोटो पोस्ट करताना देबीनाने लिहिले, ‘आमच्या गांगुली मुलीचे नाव दिविशा असे ठेवले असून, या नावाचा अर्थ सर्व देव आणि देवींची मुख्य.”
View this post on Instagram
गुरमीत आणि देबिना यांच्या फॅन्सला त्यांच्या मुलीचे नाव चांगलेच आवडलेले दिसत आहे. तशा स्वरूपाच्या कमेंट्स करत त्यांनी त्या दोघांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत. मात्र अजूनही त्यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलीचा दिविशाचा चेहरा जगाला दाखवला नाही. त्यामुळे त्यांचे फॅन्स आता दिविशाला पाहण्यासाठी खूपच उत्सुक असून ते तिच्या चेहरा दाखवण्याची गुरमीत आणि देबिनाला विनंती देखील करत आहे. नेहमीच देबिना तिच्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून सतत फॅन्सच्या संपर्कात असते. याद्वारे ती सतत त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या सर्व गोष्टींची माहिती फॅन्सला देत असते. मागच्या वर्षी ३ एप्रिल रोजी गुरमीत आणि देबिनाच्या पहिल्या मुलीचा अर्थात लियानाचा जन्म झाला त्यानंतर आठ महिन्यातच त्यांच्या दुसऱ्या मुलीचा दिविशाचा जन्म झाला.
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी संगीतबद्ध केलं होतं पहिलं गाणं; तर बराच रंजक होता आर डी बर्मन यांचा जीवनप्रवास
आर.डी बर्मन स्मृतीदिन : …आणि असे बनले आर.डी बर्मन ‘पंचम दा’, वाचा त्यांच्या नावामागचा किस्सा