Friday, November 22, 2024
Home टेलिव्हिजन लग्नाच्या तब्ब्ल ११ वर्षांनी देबिना होणार आई, ‘या’ आजारामुळे निर्माण झाल्या कन्सिव्ह करायला समस्या

लग्नाच्या तब्ब्ल ११ वर्षांनी देबिना होणार आई, ‘या’ आजारामुळे निर्माण झाल्या कन्सिव्ह करायला समस्या

सध्या मनोरंजनविश्वात अनेक सुखद घटना घडत आहे. अनेक कलाकार आईबाबा झाले असून, काही कलाकार लवकरच या नवीन आणि गोड नात्याला अनुभवणार आहेत. यातलीच एक जोडी म्हणजे देबिना आणि गुरमीत. टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय जोडी म्हणून देबिना आणि गुरमीत यांच्या जोडीकडे पाहिले जाते. टीव्ही इंडस्ट्रीमधील राम आणि सीता म्हणून या दोघांनी अमाप लोकप्रियता मिळवली. त्यानंतर या दोघांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले. मात्र सध्या ही जोडी एका वेगळ्याच आणि छान कारणामुळे चर्चेत आहे. लवकरच देबिना आणि गुरमीत आईबाबा होणार आहे. लग्नाच्या तब्ब्ल ११ वर्षांनी देबिना आई होणार असल्याने तिच्यात आणि गुरमीतमध्ये एक वेगळाच उत्साह आणि आनंद दिसून येत आहे.

देबिना तिच्या या दिवसांमध्ये देखील चांगलीच सक्रिय दिसत असून, ती सतत सोशल मीडियाच्या आणि तिच्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात आहे. तिच्या या प्रेग्नन्सीच्या दिवसांमधील विविध अनुभव ती या माध्यमातून तिच्या फॅन्ससोबत शेअर करताना दिसत असून, याच दरम्यान तिने तिला कन्सिव्ह करण्यासाठी इतके वर्ष का लागले? याचे उत्तर देखील दिले आहे. तिने तिच्या व्हिडिओ ब्लॉगमध्ये सांगितले की, ती जेव्हा प्रेग्नेंट होण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा तिला खूप त्रास झाला आणि याचे तिला खूप त्रासदायक अनुभव आले.

देबिनाने तिच्या ब्लॉगमध्ये सांगितले की, “मी डॉक्टरकडे गेले, आयव्हीएफ स्पेशालिस्ट डॉक्टरकडे गेली तेव्हा मला समजले की, मला एंडोमेट्रिओसिस आहे. मग मी यावर ट्रीटमेंटसाठी ऍक्युपंक्चर आणि इतर अनेक उपलब्ध ट्रीटमेंट घेतल्या. ‘एंडोमेट्रिओसिस’ हा असा आजार आहे ज्यात गर्भाशयात ब्लीडींग होते आणि याचमुळे कन्सिव्ह कार्याला समस्या येतात. मी यावर उपचार करण्यासाठी ऍलोपॅथी आणि आयुर्वेदिक औषधं देखील घेतले. मी रोज सकाळी १० वाजता माझ्या उपचारासाठी जायची.” देबिनाने पुढे सर्व महिलांना सल्ला देताना सांगितले की, “ज्या महिलांना पाळीच्या दिवसांमध्ये जास्त त्रास होतो त्या त्रासाला त्यांनी दुर्लक्षित करू नये. मला लहानपणापासून काहीच त्रास नाही झाला मात्र मागच्या २/३ वर्षात मला सहनशीलतेच्या पुढे त्रास व्हायचा. तेव्हा मला हे सर्व सामान्यच वाटायचे मात्र असे नव्हते. मला माहित नव्हते की, हा त्रास मला आतल्या आत आधीच झाला होता. पाळीच्या दिवसांमध्ये होणाऱ्या त्रासासाठी डॉक्टरांकडे नक्कीच जा.”

पुढे देबिनाने सांगितले की, “जीवनातल्या कोणत्याही काळात आपल्याला पाठिंबा देणाऱ्या लोकांची मदत घेण्यास कधीही मागे पुढे पाहू नका. हे खूपच आवश्यक आहे. हा तुमचा एकट्याच प्रवास नाही यात तुमच्या पतीला नक्कीच सामील करा. त्यांच्याशी प्रत्येक गोष्ट शेअर करा. प्रेग्नन्सीमध्ये खालीपण जाणवणे सामान्य आहे. तुमच्या पतीसोबत आणि जवळच्या लोकांसोबत यावर चर्चा करा.” देबिना आणि गुरमीत यांनी २०११ साली लग्न केले होते.

दैनिक बोंबाबोंचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

 हेही वाचा- 

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा