×

‘Kaun Pravin Tambe?’ | ट्रेलर आउट, श्रेयस तळपदेच्या चित्रपटात दिसली राहुल द्रविडची झलक

क्रिकेटपटू प्रवीण तांबे यांच्या जीवनावर आधारित बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘कौन प्रवीण तांबे?’ या चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. क्रिकेटर प्रवीण यांची भूमिका अभिनेता श्रेयस तळपदेने (Shreyash Talpade) साकारली आहे. त्याच्याशिवाय आशिष विद्यार्थी, परमब्रत चॅटर्जी आणि अंजली पाटील दिसणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष म्हणजे, यामध्ये प्रवीण यांच्या चित्रपटाचे सूत्रसंचालन टीम इंडियाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने (Rahul Dravid) केले आहे. ट्रेलरमध्ये दिसल्यानंतर राहुल द्रविडचे देखील चाहते प्रचंड कौतुक करत आहेत. जयप्रद देसाई दिग्दर्शित हा बायोपिक १ एप्रिल रोजी डिझनी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

कपिल देव, महेंद्रसिंग धोनीनंतर आता प्रवीण तांबे यांच्या जीवनावर बनलेला बायोपिक दिसणार आहे. ‘कौन प्रवीण तांबे?’ चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर डिझनी प्लस हॉटस्टारच्या युट्यूबवर असे लिहिले आहे की, “हा चित्रपट उजव्या हाताचा लेग-स्पिनर क्रिकेटर प्रवीण तांबे यांच्या असाधारण प्रवासावर आहे, ज्याने त्याची क्रिकेट लीग बनवली आहे. वयाच्या ४१ व्या वर्षी पदार्पण… याआधी एकही आंतरराष्ट्रीय, अगदी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले गेले नव्हते. आपल्या नशिबाशी लढून विजयी झालेल्या माणसाची कथा. क्रिकेटच्या आतापर्यंतच्या सर्वात प्रेरणादायी कथेचा अधिकृत ट्रेलर.”

वयाच्या ४१व्या वर्षी आयपीएल खेळण्यास केली सुरुवात
प्रवीण तांबे यांनी वयाच्या ४१व्या वर्षी आयपीएल सामने खेळण्यास सुरुवात केली होती. ते राजस्थान रॉयल्स, गुजरात लायन्स, सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळले आहे. याआधी प्रवीणला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती, खूप प्रयत्न करूनही यश मिळाले नाही. त्यांच्या आयुष्यातील संघर्ष दाखवणारा बायोपिक आशेचा किरण दाखवतो.

मुंबईत जन्मलेले प्रवीण तांबे ४९ वर्षांचे असून, ते अजूनही कोणत्याही तरुण खेळाडूप्रमाणे टी-२० क्रिकेट खेळतात. वयाच्या ४१ व्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या प्रवीण तांबे यांचा जन्म ८ ऑक्टोबर १९७१ रोजी झाला आणि ते लेग स्पिनर आहेत. ते आयपीएलमध्ये गुजरात लायन्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबादचा भाग होते.

या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा श्रेयस तळपदे अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) सुपर डुपर हिट चित्रपट ‘पुष्पा: द राइज’ मध्ये आपला दमदार आवाज दिल्यानंतर तो पुन्हा प्रकाशझोतात आला. अल्लू अर्जुनचा आवाज बनलेल्या श्रेयसला प्रेक्षकांनी खूप पसंत केले आणि त्याचे कौतुक केले. यापूर्वी श्रेयस तळपदेने नागेश कुकुनूर यांच्या स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट ‘इकबाल’ मध्ये २००५ साली काम केले होते आणि या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. आता ‘कौन प्रवीण तांबे’ हा चित्रपट प्रेक्षकांना कितपत आवडतो हे पाहावे लागेल.

हेही वाचा-

दैनिक बोंबाबोंचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा :

Latest Post