Monday, March 4, 2024

फायटरच्या रिलीज आधीच निर्मात्यांना झटका, दीपिका-ऋतिकच्या चित्रपटाला आखाती देशांमध्ये बंदी

दीपिका पदुकोण (deepika padukon )आणि ऋतिक रोशन(hrithik roshan) अभिनीत ‘फायटर’ यावर्षी रिलीज होणारा पहिला मोठा चित्रपट आहे. सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केलेला ही चित्रपट उद्या म्हणजेच 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. ‘ फायटर ‘ एक हवाई ऍक्शन ड्रामा आहे. फायटरची कथा ही ऋतिक रोशनने केलेल्या भुमिकेवर आधारीत आहे, जो देशाच्या रक्षणासाठी त्याच्या मिशनमध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या सकटांना सोमोरे जातो. दीपिका ही ऋतिक रोशन त्याची प्रेमिका आणि सहकारी पायलटची भुमिका निभावत आहे. आनिल कपूर हे त्यांचे गुरू आणि कंमांडरच्या भुमिकेत दिसणार आहेत. जगभरातील चाहते या चित्रपटाची वाट पाहत आहेत. परंतु अशातंच आखाती देशांमध्ये या चित्रपटाच्या रिलीज डेटबाबत एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. ज्यामुळे सहाजिकंच चाहत्यांना झटका बसणार आहे. चित्रपटात अक्षय ओबेराॅय करण सिंग ग्रोवर असे कलाकार देखील सहायक भुमिकेत दिसणार आहेत.

एका आश्चर्यचकित करणाऱ्या घटनाक्रमामुळे, दीपिका-ऋतिक अभिनीत बहुप्रतिक्षीत चित्रपट फायटरवर(Fighter) काही देशांनी बॅन केला आहे. यामध्ये युएइ सोडुन सर्व आखाती देशांचा समावेश आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा चित्रपट गणतंत्र दिनाच्या सुट्यांसोबतंच 25 जानेवारीला हो चित्रपट रिलीज होणार आहे.
या चित्रपटाची सेंसर स्क्रिनिंग 10 जानेवारीला झाली होती. 23 जानेवारीला अधिकाऱ्यांनी सुचित केलं होतं की,जवळजवळ सर्वच आखाती देशांमध्ये हा चित्रपट रिलीज होणार नाही. ही गोष्ट निर्मात्यांसाठी खुपंच धक्कादायक आहे.

चित्रपट जीसीसी सेंसरची मंजुरी घेण्यात अपयशी ठरला.या चित्रपटातील काही सीन आणि संवाद प्रेक्षकांसाठी बरोबर नसल्याचे त्यांना आढळुन आले. बॅन करण्याचं नेमकं कारण अजुनही समोर आलेले नाही. पण चित्रपटात राजनीतीवर आधारित काही संवेदनशील गोष्टी दाखवल्या असतील, असा अंदाज बांधला जात आहे. या बॅनमुळे निर्मात्यांना खुप मोठा झटका बसला आहे.कारण विदेशी बाजार आणि प्रामुख्याने आखाती देश, जिथे ऋतिक आणि दीपिकाची खुप मोठ्या प्रमाणात फॅन फाॅलोइंग आहे. त्यामुळे त्या देशांमधुन खुप मोठ्या प्रमाणात कमाई करण्याची अपेक्षा आता मात्र धुळीला मिळाली आहे.

मध्यंतरी टायगर 3 ला कुवेत आणि कतारमध्ये बॅन केलं होतं. जीसीसी सेंंसरच्या आखाती देशात बॅन करण्याच्या निर्णयामुळे ,निर्मात्याचा जवळजवळ 5 पाच लाख ते 1 मिलियन डाॅलरचा तोटा होऊ शकतो. दीपिका पदुकोण आणि ऋतिक रोशन अभिनीत ‘फायटर’कडुन निर्मात्यांना खुप अपेक्षा होत्या. परंतु ऍडवांस बुकिंग ठीक-ठाकच आहे. चित्रपट पहिल्याच दिवशी जवळपास 25 कोटींची कमाई करण्यासाठी संघर्ष करत आहे. रिलीजच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय सन असल्याने चित्रपटाला निश्चितंच फायदा होणार आहे. जर रिपोर्ट चांगला राहीला तर 100- 120 कोटींची कमाई करेल.

हे देखील वाचा