Tuesday, September 17, 2024
Home बॉलीवूड रणवीर – दीपिकाच्या घरी झाले छोट्या पावलांचे स्वागत; दीपिकाने दिला मुलीला जन्म

रणवीर – दीपिकाच्या घरी झाले छोट्या पावलांचे स्वागत; दीपिकाने दिला मुलीला जन्म

अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंग यांच्या घरात छोट्या पावलांचे स्वागत झाले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार दीपिकाने एका मुलीला जन्म दिलेला आहे. गणेश चतुर्थी सणाच्या दुसऱ्या दिवशी दाम्पत्याच्या घरी लक्ष्मीचे आगमन झाले आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात होता की दीपिका पदुकोणची डिलिव्हरी 28 सप्टेंबरला होणार आहे. पण, आता त्यांच्या घरी आज ८ सप्टेंबर रोजी एका मुलीचा जन्म झाला.

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी यावर्षी फेब्रुवारीमध्ये चाहत्यांसह एक आनंदाची बातमी शेअर केली. तेव्हापासून अभिनेत्री प्रत्येक अपडेट सोशल मीडियावर शेअर करत असते. गरोदरपणात तिने तिच्या फिटनेस आणि डाएटची पूर्ण काळजी घेतली आणि तिच्या चाहत्यांनाही याबद्दल जागरुक ठेवलं.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –   

गणेश चतुर्थीच्या खास मुहूर्तावर गायक राहुल वैद्यला झाला डेंग्यू, सोशल मीडियावर शेअर केला फोटो
‘सिकंदर’मध्ये सलमान खानच्या पात्राचे अनावरण, भाईजान दिसणार या खास भूमिकेत?

हे देखील वाचा