Monday, May 13, 2024

सलग 3 वर्षे ऑडिशनमध्ये अभिनेत्याला नाकारले गेले, ‘या’ चित्रपटाने रातोरात बनवले स्टार

हिंदी चित्रपटसृष्टीतील सध्याच्या सुप्रसिद्ध अभिनेत्यांबद्दल बोलायचे झाले, तर कार्तिक आर्यनचे नाव त्यात नक्कीच सामील होईल. कार्तिक आर्यन त्याच्या अप्रतिम अभिनयामुळे खूप प्रसिद्ध आहे. पण तुम्हाला माहित आहे का? की, कार्तिकने करिअरच्या सुरुवातीला खूप संघर्ष केला होता. कार्तिकला सलग 3 वर्षे ऑडिशनमध्ये नकाराचा सामना करावा लागला हाेता.

माध्यमातील वृत्तानुसार, कार्तिक आर्यन (kartik aaryan) याला त्याच्या सुरुवातीच्या काळात खूप अडचणींचा सामना करावा लागला हाेता. आउटसाइडर म्हणून कार्तिक आर्यनने अनेक वर्षे सातत्याने ऑडिशन दिले होते. कार्तिकने सांगितले होते की, ‘त्याने पहिल्यांदा डिओडोरंटच्या जाहिरातीसाठी ऑडिशन दिले होते. पण तो नाकारण्यात आला, कार्तिकला ऑडिशनमधून बाहेर फेकले जाण्याची प्रक्रिया जवळपास 3 वर्षे चालली. पण कार्तिकने लढण्यात कोणतीही कसर सोडली नाही.’

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

यानंतर कार्तिकला बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक लव रंजन यांच्या ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटात अभिनय करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या पहिल्याच चित्रपटात कार्तिकने आपले दमदार अभिनयाची जादू दाखवली. या चित्रपटाच्या यशानंतर कार्तिक आर्यन रातोरात स्टार झाला आणि त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. आतापर्यंत कार्तिकने ‘भूल भुलैया 2’ सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

कार्तिक आर्यनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलयचे झाले, तर आगामी काळात कार्तिक आर्यन अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. ‘आशिकी 3’, ‘सत्य प्रेम की कथा’ आणि ‘कॅप्टन इंडिया’ सारख्या चित्रपटात ताे दिसणार आहे. कार्तिकचा ‘सत्य प्रेम की कथा’ हा चित्रपट 29 जून 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कार्तिकसोबत बी टाऊन सुपरस्टार कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.(bollywood actor kartik aaryan faced rejection in audition for 3 years)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या निर्मात्यांवर ‘या’ अभिनेत्रीने लावला घृणास्पद आरोप; म्हणाली, ’15 वर्षांपासून लैंगिक शोषण…’
सलमानची बहीण अर्पिता पती आयुषसोबत दिसली ‘या’ लूकमध्ये, सोशल मीडियावर लोकांनी केल्या ‘अशा’ कमेंट

हे देखील वाचा