Saturday, April 12, 2025
Home बॉलीवूड दीपिका पदुकोणने केली व्यंकटेश्वर मंदिरात पूजा, व्हिडिओ झाला व्हायरल

दीपिका पदुकोणने केली व्यंकटेश्वर मंदिरात पूजा, व्हिडिओ झाला व्हायरल

दीपिका पदुकोण (Deepika padukone) गुरुवारी भगवान व्यंकटेश्वराची पूजा करण्यासाठी तिरुमला येथे पोहोचली. तीच्यासोबत तिची बहीण आणि व्यावसायिक गोल्फर अनिशा पदुकोणही उपस्थित होती. दोन्ही बहिणींनी व्यंकटेश्वर मंदिरात दर्शन घेऊन देवाचे आशीर्वाद घेतले.

आपल्या एक्स अकाउंटवर दीपिका पदुकोण व्यंकटेश्वर मंदिरात पूजा करतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये, दीपिका काळ्या रंगाच्या हुडी आणि पॅंटमध्ये अगदी कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. यावेळी तिने खांद्यावर काळी बॅगही घेतली होती. तर तिची बहीण अनिशा केशरी रंगाची हुडी असलेली काळी पँट परिधान केलेली आणि स्लिंग बॅग घेऊन दिसली.

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दीपिका आणि तिची बहीण अनिशा मंदिरात अतिशय शांतपणे फिरताना दिसत आहेत. दोन्ही बहिणीही मंदिरात आरती करताना दिसल्या. दीपिका पदुकोण सध्या आगामी ‘फायटर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिचा हा चित्रपट २५ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत हृतिक रोशन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आजच त्यांच्या चित्रपटातील ‘शेर खुल गया’ या गाण्याचा टीझर रिलीज झाला असून आता हे गाणे शुक्रवारी रिलीज होणार आहे.

दीपिका पदुकोणच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती अखेरची शाहरुख खानसोबत ‘जवान’ चित्रपटात दिसली होती. आता ‘फायटर’ व्यतिरिक्त, त्याच्याकडे रोहित शेट्टीचा बहुप्रतिक्षित ‘सिंघम अगेन’ चित्रपट देखील आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

सनी देओलने केले ‘ऍनिमल’मधील बॉबी देओलच्या अभिनयाचे कौतुक; म्हणाला, ‘तो आता लॉर्ड बॉबी झाला आहे’
Shreyash Talpade Heart Attack | चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान श्रेयश तळपदेला हार्ट अटॅक, अभिनेत्यावर झाली अँजिओप्लास्टी

हे देखील वाचा