Friday, March 13, 2026
Home कॅलेंडर दीपिकाने आपल्या सर्व सोशल मीडिया पोस्ट डिलिट करत चाहत्यांना दिला जबर धक्का, लोकांना लागली वेगळीच कुणकुण

दीपिकाने आपल्या सर्व सोशल मीडिया पोस्ट डिलिट करत चाहत्यांना दिला जबर धक्का, लोकांना लागली वेगळीच कुणकुण

बॉलिवूडची मस्तानी सध्या तिच्या नवऱ्यासोबत राजस्थान मधल्या रणथंभौर येथे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पोहचली असून तिच्यासोबत रणबीर कपूर, आलिया भट्ट, नितु कपूरही आहे. मात्र काल अचानक दीपिकाच्या सोशल मीडिया संबंधित एक बातमी समोर आली. दीपिका अभिनयाइतकीच सोशल मीडियावर सक्रिय आहे. दीपिकाला सोशल मीडियावर करोडो लोकं फॉलो करतात. पण आज दीपिकाच्या सोशल अकाऊंटवरून तिच्या सर्व पोस्ट डिलीट झाल्या आहेत. दीपिकाने केवळ इन्स्टाग्रामच नव्हे तर ट्विटर आणि फेसबुक या सोशल मीडिया वरुन तिच्या पोस्ट डिलीट केल्या आहेत.

आता दीपिकाच्या फॅन्सला अनेक प्रश्न पडले आहेत, तिच्या पोस्ट अचानक कुठे गायब झाल्या? ह्या पोस्ट दीपिकाने डिलीट केल्या असतील तर तिने त्या का डिलीट केल्या? असे एक ना अनेक प्रश्न पडत आहेत. दीपिकाचे सोशल मीडिया पाहून तिच्या करोडो फॅन्सला धक्का बसला आहे. दीपिका सध्या तिचे नवीन वर्ष साजरे करण्यासाठी राजस्थानमध्ये आहे त्यामुळे तिच्या फॅन्सला वाटले की, दीपिका तिच्या ट्रिपचे अनेक फोटोपोस्ट करेल पण घडले काही वेगळेच.

काहींना तर असे वाटत आहे की, दीपिकाचे अकाऊंट हॅक झालं आहे. कारण दीपिकाच्या सर्व पोस्ट डिलीट झाल्या आहेत. आणि आज काल कलाकारांचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक होण्याचे प्रमाण वाढले असल्याने दिपीकाचेही अकाऊंट हॅक झाल्याचे सांगण्यात येत आहे. दीपिकाच्या ट्विटर अकाऊंटवर पाहिले तर त्या अकाऊंटवर दीपिकाने लाईक्स केले ट्विट अजूनही दिसत आहे. काहींना हा प्रमोशनचा भाग वाटत आहे. मात्र अजून दिपीकाकडून कोणीही अधिकृत माहिती समोर आली नाहीये. फॅन्स दीपिकाला कमेंट्स करून अनेक प्रश्न विचारत आते.

नुकत्याच समोर आलेल्या वृत्तानुसार दीपिकाने एक नवीन ऑडिओ तिच्या अकाऊंट वरुन पोस्ट केला आहे. त्यात तिने 2020 विषयी आपले मत आणि नवीन वर्षाच्या शुभेछा देणारा एक ऑडिओ संदेश आपल्या चाहत्यांसाठी पोस्ट केला आहे.

 

दीपिकाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाले तर सध्या दीपिका अनेक मोठ्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दीपिकाचा ८३ हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहे. शिवाय ती शकुन बत्रा यांच्या सिनेमात अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्यासोबत दिसणार आहे. शाहरुख खानच्या आगामी पठाण मध्ये ती भूमिका साकारत आहे. सोबतच ती प्रभास सोबतही एका सिनेमात दिसणार आहे.

हे देखील वाचा