आत्ताची सर्वात टॉपची नायिका म्हणून दीपिका पादुकोण ओळखली जाते . तिला हे स्थान गाठण्यासाठी खूप मेहनत करावी लागली आहे. अनेक वर्ष संघर्ष करून दीपिकाने मनोरंजन क्षेत्रात स्वतःचे स्थान कायमस्वरूपी पक्के केले. कोणताही ठोस पाठिंबा किंवा मार्गदर्शक नसतानाही दीपिकाने फक्त आत्मविश्वास आणि मेहनतीने यश संपादन केले. स्टाईल आणि फॅशनच्या दृष्टीने दीपिकाला फॅशन क्वीन मानली जाते. तसेच ती जे काही परिधान करते, त्यात ती खूप सुंदर दिसते. भारतीय पारंपारिक ड्रेसपासून ते वेस्टर्न ड्रेसपर्यंत सर्व काही तिच्यावर एकदम खुलून दिसते.
दीपिकाने अनेक वेळा आपल्या स्टाईलने चाहत्यांना वेड लावले आहे. दीपिका अलीकडेच मुंबईत दिसली, जिथे तिने वर्साचे कॉर्सेट टॉप घातला होता. या टॉपची किंमत ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. दीपिकाने काळ्या रंगाची सैल पँट घातली आहे, तिची ही पँट एकदम वेगळी दिसत होती. त्यामुळे दीपिकाने अवघ्या चाहत्यावर्गाचे लक्ष वेधले आहे. पण वरच्या बाजूला काळ्या लेसचा पट्टा बसवला आहे, तो चाहत्यांना त्याहीपेक्षा जास्त आकर्षित करत होता.
तसेच तिने केस वरती बांधले होते आणि सुंदर असा मेकअप केला होता. तिने पायात सोनेरी रंगाचे हील्स घातले. या ड्रेसमध्ये दीपिकाचा फॅशनचा जलवा पाहायला मिळत आहे. दरम्यान, दीपिकाने परिधान केलेल्या ड्रेसची किंमत एखाद्याला धक्काच बसेल इतकी आहे. या टाॅपची किंमत नेटवर 988 डाॅलर, म्हणजेच सुमारे 72,615 रुपये आहे.
दरम्यान, मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात करणाऱ्या दीपिकाने आता बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये स्थान मिळवलंय. ओम शांती ओम’ या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या दीपिकाने आज अफाट यश, संपत्ती मिळवली आहे. दीपिका कुठेही गेली तर तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते गर्दी करत असतात.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘मी स्वत:ला स्टारकिड मानत नाही’; अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीचे मोठे वक्तव्य