[rank_math_breadcrumb]

मुलीच्या जन्मानंतर दीपिका – रणवीरने खरेदी केली आलिशान रेंज रोव्हर; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

बॉलिवूडचे अप्रतिम जोडपे रणवीर सिंग (Ranvir Singh)आणि दीपिका पदुकोण नेहमीच चर्चेत असतात. मुलीच्या जन्मानंतर हे जोडपे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. रणवीर आणि दीपिकाने नुकतेच त्यांच्या मुलीचे स्वागत केले. दीपिका पदुकोणने ८ सप्टेंबरला मुंबईत मुलीला जन्म दिला. दीपिकाने आपला आनंद सोशल मीडियावर शेअर केला होता. रणवीर सिंगने नुकतीच 4.74 कोटी रुपयांची रेंज रोव्हर खरेदी केली आहे.

रणवीर सिंग आणि पत्नी दीपिका पदुकोण यांनी त्यांच्या पहिल्या मुलीचे स्वागत केले. या चित्रात त्यांच्या घराच्या आत हिरव्या रंगाची कार उभी आहे, ज्यावर ‘6969’ नंबर प्लेट आहे. रणवीरने अगदी नवीन रेंज रोव्हर ४.४ एलबीडब्ल्यू विकत घेतली आहे. या गाडीत अनेक उत्कृष्ट वैशिष्ट्ये देखील आहेत. 360 डिग्री कॅमेरा आणि 4 झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल हे देखील त्याच्या वैशिष्ट्यांचा भाग आहेत.

अभिनेता रणवीर सिंगकडे आधीच अनेक आलिशान गाड्या आहेत. त्याला आलिशान गाड्यांचाही शौक आहे. त्याच्याकडे टोयोटा फॉर्च्युनर लिजेंडर, लॅम्बोर्गिनी उरुस पर्ल कॅप्सूल यांसारख्या आलिशान गाड्या आहेत. दीपिकाने नुकतेच मुंबईत एक अपार्टमेंटही खरेदी केले आहे.

सिंघम अगेन या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोण दिसणार आहे. ‘सिंघम अगेन’च्या ट्रेलर रिलीजदरम्यान दीपिका पदुकोणच्या जागी रणवीर सिंग दिसला होता. यामध्ये त्याने पत्नी आणि मुलीबद्दल सांगितले. हा चित्रपट 1 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

पुष्पा 2 च्या निर्मात्यांचा आश्चर्यचकित करणारा दावा; चित्रपटाने रिलीजपूर्वीच केली 1085 कोटींची कमाई…
अनुपम खेर यांनी इंस्टाग्रामवर विचारला प्रश्न; योग्य उत्तर देणाऱ्याला दिले हे बक्षीस…