हिंदी चित्रपट जगतात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्या अभिनयाची आणि ग्लॅमरची नेहमीच चर्चा होत असते. यांमध्ये सर्वात आधी नाव घेतले जाते ते म्हणजे अभिनेत्री दीपिका पदुकोणचे. बॉलिवूडची मस्तानी अशी ओळख असलेल्या दीपिका पदुकोणची (Deepika Padukone) चर्चा सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत होत असते. आपल्या दमदार अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने तिने हे यशाचे शिखर गाठले आहे. अलिकडेच अभिनेत्री दीपिका पदुकोणने तिच्या 16 व्या वाढदिवसाला मिळालेल्या गिफ्ट बद्दलचा एक गोड किस्सा सांगितला आहे. काय आहे हा किस्सा आणि ते सुंदर गिफ्ट चला जाणून घेऊ.
याबाबत संपुर्ण माहिती अशी की, अभिनेत्री दीपिका पदुकोणने एका मुलाखतीत बोलताना तिच्या एका खास गिफ्ट बद्दलचा खुलासा केला होता. ज्यावेळी तिला या मुलाखतीत तु पहिल्यांदा कधी मोठ्या कंपनीची, ब्रँन्डची वस्तू केव्हा घेतलीस असे विचारण्यात आले होते. या प्रश्नाला उत्तर देताना तिने सांगितले की “मला 16 व्या वाढदिवसानिमित्त आई वडिलांकडून एक सुंदर गिफ्ट मिळाले होते. हे गिफ्ट म्हणजे मला माझ्या आई वडिलांनी मला एका आंतरराष्ट्रीय ब्रँन्डची जिन्स घेऊन दिली होती. ती जिन्स घेण्यासाठी ते माझी शाळा सुटल्यानंतर मला भेटायला आले आणि ते मला एका मोठ्या दुकानात घेऊन गेले. त्यावेळी त्यांनी मला ती जिन्स घेऊन दिली होती. हे माझ्यासाठी सर्वात सुंदर आणि मौल्यवान गिफ्ट होते.
दरम्यान सध्याच्या काळात अभिनेत्री दीपिका पदुकोणला चित्रपट जगतातील गोल्डन गर्ल म्हणूनच ओळखले जाते. फक्त अभिनय क्षेत्रातच नव्हेतर तिने जाहिरात क्षेत्रातही आपले नाव कमावले आहे. अनेक गाजलेल्या ज्वेलरी आणि कपड्यांच्या बँन्डची दीपिका मुख्य चेहरा आहे. जगभरातील अनेक दर्जेदार उत्पादनांचे कलेक्शन तिच्याकडे आहे. दीपिका पदुकोणने नुकतेच पठाण चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.(deepika padukone shared memoey of her birthday gift)
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
सोनम कपूरच्या नवऱ्याने आनंद अहुजाने शेअर केला मुलगा वायूचा न पाहिलेला क्युट व्हिडिओ
दीपिका पदुकोणचा मॉर्निंग लूक! शेअर केल्या स्किन केअरसाठी 5 महत्वाच्या टीप्स