Tuesday, January 31, 2023

दीपिका पदुकोणचा मॉर्निंग लूक! शेअर केल्या स्किन केअरसाठी 5 महत्वाच्या टीप्स

बाॅलिवूड लाेकप्रिय अभिनेत्री दीपिका पदुकोण लवकरच शाहरुख खान याच्यासोबत ‘पठाण’ चित्रपटात दिसणार आहे. नुकतेच अभिनेत्रीने तिचे ब्युटी प्रोडक्ट लाँच केले आहे. दीपिकाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक ग्लोइंग फोटो शेअर करून तिची स्किन केअर रूटीन शेअर केले आहे. ऑरेंज जॅकेटमधला तिचा क्लोजअप फोटो चाहत्यांना खूप आवडला आहे.

अभिनेत्री दीपिका पदुकोण (deepika padukone) तिच्या फिटनेसबाबत नेहमीच जागरूक असते. याशिवाय तिने चेहऱ्याच्या व्यायामाबाबत अनेक वेळा टिप्स दिल्या आहेत. अशातच दीपिकाने तिच्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत तिचे स्किन केअर रूटीन सांगितले आहे. ही पाेस्ट शेअर करताच साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत आहे. चाहत्यांना दीपिकाचा लूक आवडला असून ते अभिनेत्रीच्या पाेस्टवर भिन्न – भिन्न कमेंट करत प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

दीपिकाने ग्लाेइंग त्वचेसाठी शेअर केल्या 5 महत्वाच्या टीप्स
दीपिकाने तिच्या फोटोसोबत लिहिले, “मी माझी त्वचेची अशाप्रकारे केअर घेते. 1. सर्व प्रथम मी माझा चेहरा थंड पाण्याने धुते. 2. त्यानंतर पटकन उठण्यासाठी मी माझ्या चेहऱ्यावर बर्फ लावतो. 3. आणि कोरडे होईपर्यंत थापते. 4. मी चेहरा आणि मानेवर अश्वगंधा घालून मॉइश्चरायझर लावते. 5. यानंतर मी सनस्क्रीन क्रीम लावते. फोटोमध्ये दीपिका खूपच ग्लोइंग दिसत आहे. फोटोसोबत तिने तिच्या ब्युटी प्रोडक्ट्सचीही माहिती दिली आहे.

दीपिकाचा ‘पठाण’ हा चित्रपट 26 जानेवारीला सिनेमागृहात हाेणार प्रदर्शित
दीपिका पदुकोण नुकतीच रणवीर सिंगचा आगामी ‘सर्कस’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही दिसली. दीपिकाने पती रणवीरच्या चित्रपटात स्पेशल डान्स नंबर केला आहे. रणवीरचा ‘सर्कस’ हा चित्रपट 23 डिसेंबरला रिलीज होत आहे. तर दीपिकाचा ‘पठाण’ हा चित्रपट 2023 मध्ये 26 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.(bollywood actress deepika padukone shares her skin care routine shows glowing face in orange jacket)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
नम्रता मल्लाच्या हॉटनेसचा कहर; डीपनेक टॉपने वेधले चाहत्यांचे लक्ष
सोनम कपूरच्या नवऱ्याने आनंद अहुजाने शेअर केला मुलगा वायूचा न पाहिलेला क्युट व्हिडिओ

हे देखील वाचा