Tuesday, January 20, 2026
Home बॉलीवूड ‘पठाण’मध्ये केवळ शाहरुखच नव्हे, तर दीपिका पादुकोणही करताना दिसणार ‘हाय ऍक्शन’ सीन

‘पठाण’मध्ये केवळ शाहरुखच नव्हे, तर दीपिका पादुकोणही करताना दिसणार ‘हाय ऍक्शन’ सीन

चित्रपटांमध्ये कॉमेडी, रोमान्स, सस्पेंस यासोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे ऍक्शन. होय चित्रपटांत ऍक्शन सीन नसेल, तर पाहिजे तेवढी रंजकता येत नाही. बहुतेक करून अभिनेते असे ऍक्शन सीन करताना आपल्याला दिसतात. मात्र गेल्या काही काळापासुन ही गोष्ट देखील बदललेली दिसत आहे. श्रद्धा कपूर, ऐश्वर्या राय, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू या अभिनेत्रींना आपण मोठ्या पडद्यावर धमाकेदार ऍक्शन करताना पाहिलं आहे. या यादीत आता आणखी एक नाव सामील झालं आहे.

शाहरुख खानचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘पठाण’ हा बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. नुकतीच अशी महिती मिळाली आहे की, या चित्रपटात दीपिका पादुकोण ऍक्शन सीन्स करताना दिसणार आहे. होय, मिळालेल्या माहितीनुसार दीपिका पहिल्यांदाच भारतीय स्क्रीनवर इंटरनॅशनल स्तरावरचा ऍक्शन सीन करणार आहे. यापुर्वी तिने असे सीन हॉलिवूडच्या ‘xXx: रिटर्न ऑफ झेंडर केज’ या चित्रपटात दिले होते. (deepika padukone to perform high octane action scenes for pathan)

‘xXx: रिटर्न ऑफ झेंडर केज’ या चित्रपटात पूर्ण स्प्लिट्सपासून ते शस्त्रांबरोबर खेळणे आणि गुंडांशी लढाई करण्यापर्यंत तिने चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते. आता दीपिका पहिल्यांदाच भारतीय चित्रपटसृष्टीत आपला ऍक्शन अवतार सादर करण्यास सज्ज झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दीपिका सध्या ‘पठाण’ चित्रपटाच्या हाय अ‍ॅक्शन सीक्वेन्सच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.

या चित्रपटाचे शूटिंग मुंबईतच सुरू आहे आणि त्यासाठी दीपिकाने जोरदार तयारी केली आहे. दीपिकाने ‘पठाण’ चित्रपटाचे पहिले शेड्यूलही पूर्ण केले आहे. सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात शाहरुख खान आणि दीपिका पादूकोण व्यतिरिक्त जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-एकेकाळी संजय दत्तवर प्रेम करायची माधुरी दीक्षित; मात्र अभिनेता जेल गेल्यानंतर बदललं सर्वकाही; असा होता ‘संजुबाबा’चा प्रवास

-अभिनेता ते साधूपर्यंत किस करण्यामुळे वादात राहिलीय शिल्पा शेट्टी; कोर्टाने जारी केला होता वॉरंट

-गौरीला ‘शक्ती : द पॉवर’मध्ये नव्हती आवडली शाहरुखची ओव्हर ऍक्टिंग; म्हणाली ‘सगळ्यात’ वाईट चित्रपट

हे देखील वाचा