Wednesday, July 2, 2025
Home बॉलीवूड दीपिकाने पती रणवीर सिंगला दिली वॉर्निंग? प्रेमात धोका दिला, तर…

दीपिकाने पती रणवीर सिंगला दिली वॉर्निंग? प्रेमात धोका दिला, तर…

हिंदी चित्रपटसृष्टीचे बाजीराव आणि मस्तानी अशी ओळख असलेले रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण हे क्यूट कपल म्हणून ओळखले जाते. दोघेही चित्रपट जगतातील लोकप्रिय कलाकार असून त्यांचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. आपल्या वैवाहिक आयुष्यात मग्न असलेल्या दीपिकाने अलीकडेच एका मुलाखतीत रणवीर सिंगबद्दल काही धक्कादायक खुलासे केले होते, ज्यामुळे सगळेच थक्क झाले होते.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणची (Deepika Padukone) स्टाईल आणि सौंदर्य पाहून फक्त मुलीच नाही, तर मुलेही फिदा होतात. लग्नानंतरही तिच्या चिरतरुण सौंदर्याची नेहमीच चर्चा पाहायला मिळते. ‘ओम शांती ओम’ चित्रपटातून करिअरची सुरुवात करणारी दीपिका तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत राहिली आहे. तिच्या आणि रणबीर कपूरच्या प्रेम प्रकरणाचीही जोरदार चर्चा पाहायला मिळाली होती. ते दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. पण जेव्हा या नात्यात दीपिकाची फसवणूक झाली, तेव्हा मात्र दीपिका पूर्णपणे दुःखी झाली होती. आता दीपिका तिच्या वैवाहिक आयुष्यात खूप आनंदी आहे. ती रणवीर सिंगसोबत खूप आनंदी आयुष्य जगत आहे. मात्र, आधी प्रेमात धोका मिळालेली दीपिका आता प्रत्येक पाऊल जपून टाकत असते.

माध्यमांतील वृत्तांनुसार, जेव्हा दीपिकाला एका मुलाखतीत विचारण्यात आले होते की, जर तुला कळले की, तुझा पार्टनर तुझी फसवणूक करत आहे, तर तुझी प्रतिक्रिया काय असेल? त्यावेळी दीपिकाच्या उत्तराने सगळ्यांनाच चकित केले होते. या प्रश्नाचे उत्तर देताना दीपिकाने सांगितले होते की, “हा माझ्यासाठी मोठा आघात असेल. असे उत्तर देणे आणि प्रत्यक्ष त्या परिस्थितीला सामोरे जाणे यात खूप फरक असतो, पण हे नाते दोघांसाठी किती महत्वाचे आहे हे पाहणे गरजेचे असते. अशी चूक करण्यापाठीमागची कारणे आपल्याला समजून घेतली पाहिजेत.”

याबद्दल पुढे बोलताना दीपिका म्हणाली होती की, “आपल्या समाजात धोका देणे म्हणजे चुकीचे समजले जाते, पण त्यावेळी आपण स्वतःला त्या व्यक्तीच्या जागी ठेवून पाहिले पाहिजे म्हणजे त्याच्या परिस्तिथीची आपल्याला जाणीव होईल.” दीपिकाच्या या उत्तराने हेच समजते की, ती प्रेमाच्या नात्याबद्दल किती संवेदनशील आहे.

हेही पाहा- बाई वाड्यावर या’ बोलणाऱ्या निळू भाऊंनी लहान असताना स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता | Nilu Fule

दीपिका सध्या तिच्या ‘गेहराइयां’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

हेही वाचा-

हे देखील वाचा