Friday, July 12, 2024

‘गहराइया’ सिनेमात सिद्धांत चतुर्वेदीसोबत दीपिकाने दिलेल्या बोल्ड सीन्सवर आली रणवीर सिंगची प्रतिक्रिया, म्हणाला….

बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींनी लग्नानंतर चित्रपटांमध्ये बोल्ड सीन्स देणे म्हणजे अनेक चर्चांना उधाण येते. नुकताच अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या आगामी ‘गहराइया’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमाच्या टिझरनंतर प्रत्येकालाच या सिनेमाची ट्रेलरची खूपच उत्सुकता होती अखेर या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, ट्रेलरला तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सर्वात जास्त चर्चा होत आहे दीपिका आणि सिद्धांत यांच्यातल्या बोल्ड सीन्सची. या दोघांची सिनेमात दिसणाऱ्या केमिस्ट्री सध्या चर्चेचा विषय बनली आहे. या ट्रेलरनंतर इंटरनेटवर दीपिकाच्या या सीन्सवर रणवीर सिंग काय प्रतिक्रिया देणार यावर अनेक कमेंट्स येत होत्या.

अखेर रणवीर सिंगने दीपिकाच्या या सिनेमाच्या ट्रेलरवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘गहराइया’ हा सिनेमा लवकरच अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर फॅन्ससोबतच कलाकारांनी देखील या सिनेमाच्या ट्रेलरचे कौतुक करत सोशल मीडियावर पोस्ट दिल्या आहेत. या ट्रेलरवर कलाकारांनी दिलेल्या कमेंट्समध्ये रणवीर सिंगची कमेंट्स सध्या सर्वत्र गाजताना दिसत आहे. रणवीरने त्याच्या इंस्टाग्रा अकाऊंटवर चित्रपटाचे एक पोस्टर शेअर करत लिहिले, “मुडी, मादक, इंटेन्स, डोमेस्टिक नोअर? मला पण साईन करा ना. शकुन बत्रा, अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी, धैर्य करवा, नसीर द लीजेंड तुम्ही सर्वच माझ्या आवडीचे आहात.”

रणवीरने त्याची ही पोस्ट दीपिकाला टॅग करत लिहिले, “माझी बेबी गर्ल तू खूप लाखमोलाची दिसत आहे.” रणवीरच्या या पोस्टवर अन्नया पांडे ,सिद्धांत चतुर्वेदी आणि अमेझॉन प्राईम व्हिडिओने कमेंट्स करत लिहिले आहे की, “आम्ही तुझ्या या पोस्टमधील ‘गहराइला’ (खोलपणाला) समजू शकतो.”

या सिनेमाचा ट्रेलर करण जोहरने लाँच केला त्यावेळी त्याने सांगितले की, “‘गहराइया’ प्रेम, लालसा आणि तडपची गोष्ट आहे. हा सिनेमाची कथा ही आजच्या काळातील प्रेम कहाणी दाखवत आहे. एक अशी प्रेम कहाणी जिच्या दगाबाजीमध्ये स्वतःचे आपले काही कारणं आहेत. शकुन बात्रा यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा ११ फेब्रुवारी २०२२ रोजी अमेझॉन या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात नसीरुद्दीन शाह आणि रजत कपूर हे प्रतिभावान कलाकार देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा