Friday, July 5, 2024

दुःखद! दिल्लीचा संगीतकार-गायक शील सागरचे निधन, वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दिल्लीस्थित स्वतंत्र गायक-गीतकार आणि बहु-वाद्य वादक शील सागर (Sheil Sagar) याचे बुधवारी (१ जून) अज्ञात कारणाने निधन झाले आहे. रिपोर्टनुसार, सागरने ‘इफ आय ट्राइड’ या त्याच्या पहिल्या गाण्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. हे गाणे प्रदर्शित होताच, सागरने सर्वत्र वाहवा मिळवली आणि तो लोकांमध्ये लोकप्रिय झाला.

याशिवाय त्याने गेल्या वर्षी ‘बिफोर इट गोज’, ‘स्टिल’ आणि ‘मिस्टर मोबाइल मॅन – लाइव्ह’ यासह आणखी तीन गाणी रिलीझ केली. शील सागरचे ‘मिस्टर मोबाइल मॅन-लाइव्ह’ हे गाणे गुरुग्राममधील द पियानो मॅन जॅझ क्लबमध्ये रेकॉर्ड करण्यात आले आणि त्याचे लाइव्ह शूट करण्यात आले होते. याशिवाय सागरने अनेक संगीत पुरस्कारही जिंकले होते. (delhi based musician and singer sheil sagar passes away at the age of 22)

शील सागरच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला असून, सोशल मीडियावर त्याच्या अकाली निधनाबद्दल शोक व्यक्त केला जात आहे. एका युजरने ट्वीट करत लिहिले की, “संगीतकारांसोबत काय होत आहे? आधी सिद्धू, मग केके आणि आता शील. शील हा डीयू म्युझिक सर्किटचा एक अप्रतिम गायक-गीतकार होता. आरआयपी.”

त्याच वेळी दुसर्‍याने लिहिले, “मी त्याला वैयक्तिकरित्या ओळखत नव्हतो. परंतु मी एकदाच त्याच्या शोमध्ये सामील झालो होतो आणि म्हणून मी त्याच्याशी कनेक्ट होऊ शकलो. एक कलाकार म्हणून तो ज्या टप्प्यातून जात होता, तो मार्ग मला खरोखर आवडला. आपण एक रत्न गमावला. कृपया प्रत्येक कलाकाराला स्वतंत्र पाठिंबा देणे सुरू करा.”

यासोबत अनेक युजर्सने शील सागरच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा