टीव्ही जगताचा ‘ऑस्कर’ समजल्या जाणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिशय मानाच्या एमी पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली. सन १९४९ पासून सुरु झालेल्या ‘एमी पुरस्कारांचे’ २०२० हे ४८ वे वर्ष आहे. या वर्षाचे एमी पुरस्कार संपूर्ण भारतीयांसाठी खास ठरले. सर्व भारतीयांचा गौरव वाढवणारा आणि भारतीय मनोरंजन क्षेत्रासाठी अभिमानास्पद असा हा एमी पुरस्कार ‘दिल्ली क्राईम’ या वेबसिरिजला मिळाला आहे.
“ड्रामा कॅटेगरीमध्ये नेटफ्लिक्सच्या ‘दिल्ली क्राईम’ या वेबसिरीजने हा पुरस्कार पटकावत भारतीयांची मान उंचावली आहे. यासोबतच ‘दिल्ली क्राईम’
‘दिल्ली क्राईम’ ही वेबसिरीज १६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीमध्ये चालत्या बसमध्ये झालेल्या क्रूर गँगरेप आणि हत्या या घृणास्पद घटनेवर आधारित आहे. या वेबसिरीजमध्ये शेफाली शाह यांच्याबरोबरच राजेश तैलंग, आदिल हुसैन, रसिका दुग्गल, यशस्विनी दयामा, गोपाल दत्त तिवारी, जया भट्टाचार्य, अभिलाषा सिंह, विनोद शारावत, मृदुल शर्मा, अनुराग अरोड़ा, सिद्धार्थ भारद्वाज यांसारखे दमदार कलाकारांची फौज आपल्याला पाहायला मिळते.
भारतीय-कॅनडियन दिग्दर्शक रिची मेहता यांनी या सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. रिची मेहता यांनी हा सन्मान स्वीकारताना मी संपूर्ण महिलांना मी हा पुरस्कार समर्पित करते असे सांगितले.
यावर्षी ‘दिल्ली क्राईम’ सोबतच एमी पुरस्कारांमध्ये आणखी दोन भारतीय नामांकन होती, त्यात ‘फोर मोअर शॉट्स प्लीज’ या वेबसीरिजला ‘सर्वोत्कृष्ट कॉमेडी’ साठी तर ‘मेड इन हेवन’ मधील अर्जून माथूरच्या भूमिकेला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ यासाठी नामांकन मिळाले होते.
कोरोना व्हायरसमुळे यावर्षीचा आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार सोहळा व्हर्च्यूअल फॉरमॅटमध्ये आयोजित करण्यात आला होता. या पुरस्कार सोहळयाचे सूत्रसंचालन रिचर्ड काइंडने यांनी केले.