Thursday, March 28, 2024

दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली जुही चावलाची ५जी तंत्रज्ञानावरील याचिका; लावला २० लाख रुपयांचा दंड

बॉलिवूड अभिनेत्री जुही चावलाने ५जी तंत्रज्ञानाविरुद्ध दाखल केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यासोबतच तब्बल २० लाख रुपयांचा दंडही लावण्यात आला आहे. न्यायालयाने म्हटले की, असे वाटते ही याचिका पब्लिसिटीसाठी दाखल केली होती आणि अभिनेत्रीने सुनावणीची लिंकही सोशल मीडियावर शेअर केली होती.

न्यायालयाने दिल्ली पोलिसांना आदेश दिला आहे की, न्यायालयाच्या मागील सुनावणीदरम्यान मोठ-मोठ्या आवाजात गाणे म्हणणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कायद्यानुसार कडक कारवाई केली जावी.

दिल्ली उच्च न्यायालयाने जुही चावलाची याचिका फेटाळत म्हटले की, याचिकाकर्त्याने कायदेशीर प्रक्रियेचा चुकीचा वापर केला आहे. त्यामुळेच तिच्यावर २० लाख रुपयांचा दंड लावण्यात आला.

न्यायालयाने असे म्हटले की, अभिनेत्रीच्या याचिकेत फक्त काही गोष्टी योग्य आहेत. बाकी सर्व तर्क लावण्यात आले आहेत आणि शंका उपस्थित केली आहे.

न्यायालयाने यासोबतच जुहीच्या वकिलाला आदेश दिले की, या प्रकरणात न्यायालयातील नियमांसह जे न्यायालयाचे शुल्क आहे ते देखील न्यायालयात जमा करावे. कारण केस दाखल करताना जमा केलेली न्यायालयाची फी नियमानुसार फारच कमी होती.

खरं तर अभिनेत्री जुही चावलाने दिल्ली उच्च न्यायालयात ५जी तंत्रज्ञानाच्या तपासणीवर प्रश्न उपस्थित केले होते. याचिकेत असे म्हटले होते की, अशाप्रकारच्या प्रकरणात अभ्यास केला गेला पाहिजे की यामुळे व्यक्ती, प्राणी आणि निसर्गाचे नुकसान तर होत नाहीये. सुनावणीदरम्यान जेव्हा न्यायालयाने प्रश्न विचारला की, कोणत्या आधारावर तिने हा संशय व्यक्त केला आहे? या प्रकरणाबाबत कोणतीही माहिती, अभ्यास किंवा रिपोर्ट आहे का? यावर प्रत्युत्तर देत नाही म्हटले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा