मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकलेली बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. या दरम्यान, आता अभिनेत्रीशी संबंधित आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अभिनेत्रीची सोमवारी (दि. 12 सप्टेंबर) होणारी चौकशी पुढे ढकलली आहे. आता शाखा या संदर्भात जॅकलिनला आणखी एक समन्स बजावणार आहे. सुकेश चंद्रशेखरच्या 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात तपासासाठी दिल्ली पोलिसांनी जॅकलिनला समन्स बजावले आहे.
या संदर्भात एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने एका वृत्तसंस्थेशी संवाद साधताना सांगितले की, जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) हिने दिल्ली पोलिसांना ई-मेलद्वारे कळवले होते की, आधीच केलेल्या काही कमिटमेंट्समुळे ती 12 सप्टेंबर रोजी होणाऱ्या तपासाला उपस्थित राहू शकणार नाही. या अधिकाऱ्याने असेही सांगितले की, जॅकलिनला सप्टेंबरमध्ये तपासात सहभागी होण्यासाठी बोलावण्यात आले होते. यादरम्यान, अभिनेत्री 12 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता मंदिर मार्गावरील ईओडब्ल्यू कार्यालयात उपस्थित राहणार होती. मात्र, आता तपासात सहभागी न झाल्यामुळे तिला नव्याने समन्स बजावण्यात येणार असून, त्याची तारीख लवकरच निश्चित केली जाणार आहे.
जॅकलिनचा सुकेशच्या गुन्ह्यात सहभाग असल्याची माहिती मिळाल्याने ईडीने आपल्या चार्जशीटमध्ये जॅकलिनचे नाव मनी लाँड्रिंग प्रकरणात दिले होते. त्यानंतरही तिने सुकेशच्या गुन्ह्याच्या नोंदीकडे दुर्लक्ष करून आर्थिक वहार केले. त्यामुळे, मुंबई पोलिसांनी जॅकलिनविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता.
View this post on Instagram
मनी लाँड्रिंग प्रकरणात तिचे नाव आल्यापासून अभिनेत्री अनेकवेळा ईडी चौकशीसाठी हजर झाली आहे. या प्रकरणी अभिनेत्रीची 30 ऑगस्ट आणि 20 ऑक्टोबर, 2021 रोजी चौकशीही करण्यात आली होती. यादरम्यान अभिनेत्रीने सुकेशकडून अनेक महागड्या भेटवस्तू घेतल्याचे कबूल केले होते. सुकेश चंद्रशेखर हा मूळचा कर्नाटकातील बंगळुरूचा रहिवासी आहे. मात्र, तो सध्या दिल्लीच्या तुरुंगात बंद असून त्याच्यावर 10 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. रोहिणी तुरुंगात असताना सुकेशवर 200 कोटी रुपयांच्या खंडणीचा आरोप लावण्यात आला आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
शाहरुखच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! रुपेरी पडदाच नाही, तर ओटीटीवरही दाखवणार अभिनयाची जादू
परदेशी डान्स ग्रूपने ‘तू चीज बड़ी है मस्त मस्त’ गाण्यावर केला भन्नाट डान्स, व्हिडिओ पाहिला का?
लग्नापूर्वी ऐश्वर्यासाठी ‘हा’ अभिनेता होता इंडस्ट्रीतील ‘सेक्सी’ पुरुष; अभिनेत्रीने कुणाचे घेतलेले नाव?