Wednesday, April 17, 2024

लग्नापूर्वी ऐश्वर्यासाठी ‘हा’ अभिनेता होता इंडस्ट्रीतील ‘सेक्सी’ पुरुष; अभिनेत्रीने कुणाचे घेतलेले नाव?

जेव्हाही बॉलिवूडमधील प्रेम कहाणींबद्दल चर्चा होईल, तेव्हा कदाचित सलमान खान आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या कहाणीचा उल्लेख झाल्याशिवाय राहणार नाही. सलमान आणि ऐश्वर्याची प्रेमकहाणी अपुरी राहिली असेल, पण त्यांची चर्चा आजही होते. एक काळ असा होता, जेव्हा सलमान आणि ऐश्वर्या हे एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाले होते. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आले होते. मात्र, त्यांच्या नात्यात अशी काही ठिणगी पडली की, आता त्यांना एकमेकांचे तोंडदेखील पाहावेसे वाटत नाही.

सलमान खान (Salman Khan) आणि ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) जेव्हाही ते समारंभात एकमेकांसमोर येतात, तेव्हा दुर्लक्ष करून निघून जातात. अशात ऐश्वर्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये ती सलमानबद्दल बोलताना दिसत आहे.

खरं तर, हा व्हिडिओ तेव्हाचा आहे, जेव्हा ती अभिनेत्री सिमी गरेवाल यांच्या ‘रेन्डेजवस विथ सिमी गरेवाल’ या शोमध्ये पोहोचली होती. सन 1999 मध्ये सिमी यांच्या या शोमध्ये ऐश्वर्याने तिच्या आयुष्याशी निगडीत अनेक रंजक गोष्टींचा खुलासा केला होता. सिमी यांनी या मुलाखतीत ऐश्वर्याला इंडस्ट्रीतील सर्वात सेक्सिएस्ट आणि शानदार व्यक्तीबद्दल विचारले होते. त्यावर ऐश्वर्याने सलमान खान याचे नाव घेतले होते. व्हिडिओत दिसते की, या प्रश्नावर ऐश्वर्या काही वेळ शांत राहते. त्यानंतर ती बोलते की, “सेक्सिएस्ट हा शब्द चार्मिंगने बदलला जाऊ शकतो का?” यावर सिमी म्हणतात की, तुम्हाला याच शब्दावर त्या व्यक्तीचे नाव सांगावे लागेल.

यानंतर ऐश्वर्या या प्रश्नाचे उत्तर देत म्हणते की, “जर आपण लूक्सबद्दल बोलत आहोत, तर मग त्यांचेच नाव घ्यावे लागेल, ज्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय पुरुषांमधून निवडले गेले आहे. सलमान खान.”

ऐश्वर्याचा हा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्याचे नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडले गेले. मात्र, तिने महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चन याच्याशी संसार थाटला. त्यांचे लग्न 20 एप्रिल, 2007मध्ये पार पडले होते. ऐश्वर्या आणि अभिषेकला एक सुंदर लेकही आहे. तिचे नाव आराध्या असे आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
बापरे बाप! जान्हवी कपूरला मोडायचे होते ऐश्वर्या-अभिषेकचे लग्न, हाताची नस कापून केलेला आत्महत्येचा प्रयत्न
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनच्या लग्नावर सलमान खानने दिली होती प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मी ऐश्वर्याच्या…’

हे देखील वाचा