Wednesday, June 25, 2025
Home टेलिव्हिजन कॉमेडियन मुनव्वर फारुखी वादाच्या भोवऱ्यात, विश्व हिंदू परिषदेने दिली मोठी धमकी

कॉमेडियन मुनव्वर फारुखी वादाच्या भोवऱ्यात, विश्व हिंदू परिषदेने दिली मोठी धमकी

प्रसिद्ध कॉमेडियन मुनव्वर फारुखी त्याच्या विवादांमुळे नेहमीच चर्चेत येत असतो. मुन्नवर अनेक  विषयांवर त्याचे मत मांडताना दिसत असतो. ज्यामुळे अनेकदा तो रोश ओढवून घेत असतो. आता मुन्नवरचा शो पुन्हा एकदा अशाच वादात सापडला आहे. ज्यामुळे त्याचा शो रद्द करण्यात आला आहे. 

वास्तविक मुन्नवर फारुखीचा बंगळुरमधील शो रद्द करण्यात आला होता. त्यानंतर आता त्याचा दिल्लीमधील शो सुद्धा रद्द करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला दिल्ली पोलिसांच्या परवाना शाखेने परवानगी देण्यास नकार दिला होता. विश्व हिंदु परिषदेने दिलेल्या धमकीनंतर हा शो रद्द करण्यात आला. मुन्नवरच्या शोमुळे शांततेचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो असे कारण यासाठी देण्यात आले होते. हा कार्यक्रम २८ ऑगस्ट रोजी दिल्लीमधील केदारनाथ साहनी सभागृहात होणार होता.

हेही वाचा – लग्नाआधीच प्रेग्नेंट झाली होती नेहा धुपिया, तर ताणामुळे खूपच बिघडली होती अभिनेत्रीच्या आईची प्रकृती
यशस्वी सूत्रसंचालिका ते फरहान अख्तरची गर्लफ्रेंड असणाऱ्या शिबानी दांडेकरबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहे का?डोक्याला शॉट! गर्लफ्रेंड प्रेग्नंट, एक्स गर्लफ्रेंडही प्रेग्नंट, प्रसिद्ध अभिनेता दहाव्यांदा बनणार बापमाणूस

 

हे देखील वाचा