Monday, October 2, 2023

यशस्वी सूत्रसंचालिका ते फरहान अख्तरची गर्लफ्रेंड असणाऱ्या शिबानी दांडेकरबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहे का?

आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये अनेक कलाकार हे भारताबाहेरून आले असून, त्यांनी इथे त्यांचे करियर केले आहे. अनेक कलाकार त्यांच्या करियरमध्ये हिट झाले तर काही फ्लॉप झाले. यात असेही काही कलाकार आहेत, ज्यांनी जास्त काम न करता देखील वेगवेगळ्या कारणांमुळे ते प्रसिद्ध झाले. आपल्या या इंडस्ट्रीमध्ये असे अगणित कलाकार आहेत, त्यांच्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे शिबानी दांडेकर.  अभिनेत्री, मॉडेल, गायिका असणाऱ्या शिबानीने चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. आज शिबानी तिचा वाढदिवस साजरा करत आहे. जाणून घेऊया तिच्याबद्दल अधिक माहिती.

शिबानीचा (shibani dandekar)जन्म  27 ऑगस्ट 1981 साली पुण्यात झाला. शिबानीला अजून अपेक्षा दांडेकर आणि अनुषा दांडेकर या दोन बहिणी देखील आहे. शिबानीचे सर्व बालपण हे आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये गेले. या तिघं बहिणींनी मिळून ‘डी मेजर’ नावाचं एक म्युझिक बँड तयार केला आहे. शिबानीने तिच्या करियरची सुरुवात अमेरिकेतील टीव्ही शोच्या सूत्रसंचालनापासून केली. तिने अमेरिकेत अनेक टीव्ही शो होस्ट केले. पुढे ती भारतात आली, आणि तिने भारतीय मनोरंजन विश्वात काम करण्यास सुरुवात केली. (Birthday special shibani dandekar)

शिबानीला सूत्रसंचालन करायला खूप आवडते. किंबहुना तिचा सूत्रसंचालनमध्ये चांगलाच हातखंडा आहे. त्यामुळे ती भारतातही अनेक शचे सूत्रसंचालन करताना दिसली. यात कहसकरून तिने आयपीएल सामन्यांचे होस्टिंग केले. सोबतच तिने अनेक पुरस्कार सोहळे, अनेक शो यांमध्ये देखील सूत्रसंचालक म्हणून काम केले. यातच 2014 साली शिबानी रवी जाधव यांच्या ‘टाईमपास’ सिनेमात ‘ही पोळी साजूक तुपातली’ या गाण्यात दिसली. त्यानंतर तिने ‘रॉय’, ‘शानदार’, ‘नाम शबाना’, ‘नूर’, ‘सुलतान’, ‘भावेश जोशी’ आदी चित्रपटांमध्ये छोट्या भूमिकांमध्ये झळकली.

शिबानीला सर्वात जास्त लोकप्रियता तेव्हा मिळाली जेव्हा तिचे नाव अभिनेता दिग्दर्शक फरहान अख्तरबरोबर जोडले गेले. एका शो दरम्यान या दोघांची पहिली भेट झाली आणि पुढे मैत्री आणि नंतर प्रेम असा त्यांचा प्रवास झाला. या दोघांना पहिल्यांदा दीपिका आणि रणवीर यांच्या रिसेप्शनला पहिल्यांदासोबत पाहिले गेले होते. मात्र त्याआधीच त्यांच्या अफेयरच्या चर्चा मीडियामध्ये चालू होत्या.

फरहान हा बॉलिवूडमधील यशस्वी दिग्दर्शक आणि प्रतिभावान अभिनेता म्हणून ओळखला जातो. फरहानचे पहिले लग्न अधुनासोबत 2000 साली झाले होते मात्र त्यांनी लग्नाच्या काही वर्षांनी म्हणजेच 2017 मध्ये घटस्फोट घेतला. मागील तीन वर्षांपासून फरहान आणि शिबानी नात्यात आहे. शिबानीने तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फरहानच्या नावाचा टॅटू गेल्यावर काढला आहे. सोशल मीडियावर तिने नुकताच या टॅटूचा फोटो पोस्ट केला आहे.

हेही नक्की वाचा-
शूटिंगदरम्यान नेहा धूपियाने खाल्ल्या होत्या चक्क 35 पाणीपुरी, खऱ्या आयुष्यात खाते इतक्या पाणीपुरी
‘आर्ची’चे साडीतलं फोटो पाहून चाहते झाले ‘सैराट’; Photos

हे देखील वाचा