सुप्रसिद्ध अभिनेता सोनू सूद हा जितका त्याच्या अभिनयामुळे प्रसिद्ध झाला, त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रसिद्ध मागील कोरोना-लॉकडाऊन काळात केलेल्या कामामूळे झाला आहे.
लॉकडाऊनच्या काळात सगळेच जण घरात होते. परंतू, मुंबईत असलेल्या मजुरांना त्यांच्या गावी जायचं होतं. शासनाकडून देखील प्रयत्न होत होते. परंतू, मागणी जास्त होती आणि पुरवठा कमी, अशावेळी अभिनेता सोनू सूद पुढे आला. यानंतर त्याने कशाप्रकारे या मजुरांची मदत केली आणि त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवलं, हे आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे.
लोक त्याची तुलना दानशूर कर्णासोबत करू लागले. यानंतर सोनुच्या आयुष्याची प्राथमिकताच बदलून गेली. त्याला जमेल तशी आणि जमेल त्यांना तो मदत करू लागला आहे.

नुकताच मुंबईमध्ये रस्ते अपघातात एका डिलीवरी बॉयचा मृत्यू झाला. सोनू सूदला ही माहिती समजताच त्याने तिथे धाव घेतली आणि एक मोठे काम केले. हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे, ते आपण पाहुयात.
मुंबईच्या अंधेरी भागात डिलीवरी बॉय सतीश पारसनाथ गुप्ता (१९) याचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ही बातमी समजताच अभिनेता सोनू सूद मृतकाच्या कुटूंबाच्या मदतीसाठी धावून गेला. गुरुवारी रात्री झालेल्या या अपघातात वेगवान मर्सिडिजने या डिलीवरी बॉयच्या स्कुटीला जोरदार धडक दिली. याच त्याचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी याप्रकरणी एका २० वर्षीय व्यक्तीला अटक देखील केली. मात्र, प्रमुख मुद्दा होता तो डिलिवरी बॉय आणि त्याच्या गरीब कुटुंबाचा. याबाबत कार्य केले ते सोनू सूद याने. सोनूने घटनास्थळी धाव घेत मृत सतिशच्या घरच्या सदस्यांना लागणाऱ्या आर्थिक बाबींची पूर्तता करण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले.
सोनूने मृत सतीशच्या कुटूंबाशी आणि या प्रकरणात तपास करणार्या तत्सम अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच दोषींना कडक शिक्षा करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन कुटुंबीयांना दिले आहे. ही घटना गुरुवारी रात्री अडीच ते तीनच्या दरम्यान घडली. मृत तरूण सतिश याच्या मामांनी या प्रकरणी सतीशला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.










