मराठी टेलिव्हिजनवर अनेक नवनवीन कार्यक्रम सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचाही जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. सध्या ‘बस बाई बस’ हा आणखी एक कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कार्यक्रमात अनेक दिग्गज सेलिब्रिटी सहभागी होत असतात. त्यामुळेच हा कार्यक्रम पहिल्यापासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या या कार्यक्रमात लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) सहभागी होणार आहेत. ज्याचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
‘बस बाई बस’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. कलाकारांसोबतच या कार्यक्रमात अनेक दिग्गज नेतेमंडळीही सहभागी होताना दिसत असतात. काही दिवसांपूर्वीच या कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यांच्या सहभागाचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या प्रोमोमध्ये अमृता फडणवीस यांनी अनेक विषयांवर उघडपणे भाष्य केलेले दिसत आहे.
यावेळी कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी त्यांना लोक मामी म्हणून हाक मारतात तेव्हा त्यांना कस वाटत याबद्दलही मनमोकळेपणाने सांगितले आहे. जेव्हा त्यांना याबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी “खर सांगू का, मला मज्जा येते,” असं हटके उत्तर दिले आहे. कार्यक्रमाचा हा प्रोमो जोरदार व्हायरल होत असून आता नेटकऱ्यांनाही या एपिसोडची जोरदार उत्सुकता लागली आहे.
View this post on Instagram
दरम्यान अमृता फडणवीस सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. त्या त्यांच्या गाण्यांसाठी तर प्रसिद्ध आहेतच त्याचबरोबर विविध राजकीय विषयांवर त्या नेहमीच रोखठोक भूमिका मांडताना दिसत असतात. त्यामुळेच अनेकदा त्यांच्यावर जोरदार टिकाही होताना दिसत असते.
हेही वाचा –
‘तारक मेहता’ मालिकेचे ग्रहण काही सुटेना! आता ‘हा’ कलाकार ठोकणार कार्यक्रमाला रामराम
‘या’ अभिनेत्याने उडवली होती राजेश खन्ना यांची झोप, १०० चित्रपट करूनही मिळाले नाही यश
श्रद्धा आर्याने केला लव्ह लाईफचा खुलासा, पतीच्या ‘त्या’ गोष्टीत अडकलाय अभिनेत्रीचा जीव