‘तारक मेहता’ मालिकेचे ग्रहण काही सुटेना! आता ‘हा’ कलाकार ठोकणार कार्यक्रमाला रामराम

टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणून ”तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Tarak Mehta Ka ooltah Chasmha) या कार्यक्रमाचे नाव घेतले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून हा कार्यक्रम टीआरपीच्या बाबतीतही टॉपला आहे. मालिकेची विनोदी मांडणी आणि कलाकारांचा अभिनय यांमुळे घराघरात या कार्यक्रमाला मोठी लोकप्रियता मिळाली आहे. काही दिवसांपासून या कार्यक्रमातील अनेक कलाकारांनी कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला होता. आता या कार्यक्रमातील आणखी एका कलाकाराने मालिका सोडण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा’ चश्मा सर्वत्र प्रसिद्ध आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. कार्यक्रमात जेठालाल, पोपटलाल, अशी अनेक मजेशीर पात्रे आहेत. कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केली आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून या मालिकेतील अनेक कलाकार मालिका सोडताना दिसत आहेत. मालिकेतील जेठालालची पत्नी दयाबेन म्हणजेच दिशा वाकानीने काही महिन्यांपूर्वीच ही मालिका सोडल्याचे जाहिर केले होते. त्यानंतर तारक मेहताच्या भूमिकेतील शैलैश लोढा यांनीही ही मालिका सोडली होती. आता जेठालालच्या मुलाची भूमिका साकारणारा टप्पू म्हणजेच राज अनादकतनेही मालिका सोडल्याची चर्चा सुरू झाली आहे.

राज अनादकत या मालिकत टप्पूची भूमिका साकारत आहे. अल्पावधीतच त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत होता.२०१७ मध्ये त्याने या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. आपल्या दमदार अभिनयाने त्याने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले होते. तो मालिका सोडणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. परंतु त्याने कधीही याबद्दल उघडपणे मत व्यक्त केले नव्हते. परंतु आता पुन्हा एकदा नव्याने याबद्दल चर्चा सुरू झाले आहे. यावर राजने तो लवकरच घोषणा करणार असल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा – ‘मी मनापासून माफी मागतो पण…’ राजकारणावरील भाष्यावर सुबोध भावेने मागितली माफी, विचित्र अट समोर

श्रद्धा आर्याने केला लव्ह लाईफचा खुलासा, पतीच्या ‘त्या’ गोष्टीत अडकलाय अभिनेत्रीचा जीव

प्रेग्नेंट आलिया म्हणतीये, ‘मला आणखी १०० वर्ष काम करायचे आहे…’

 

Latest Post