महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं ‘मुड बना लिया’ नुकतंच प्रदर्शित झालं असून प्रेक्षकांच्या पसंतीस अतरलं आहे. या गाण्यामध्ये अमृता फडणवीस यांनी भन्नाट डान्स केला आहे, त्याशिवया त्यांना गायनाचीही खूप आवड आहे. मूड बना लिया या गाण्याला एका दिवसांतच दहा मिलियन व्ह्युजचा टप्पा पार केला आहे.
अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं ‘मुड बना लिया’ प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. त्याशिवाय चाहत्यांनी देखिल या गाण्याला चांगला प्रतिसाद दिला आहे. मात्र, काहींनी अमृताजींना ट्रोलही केलं आहे. खरी गंमत म्हणजे मुड बना लिया हे गाणं पाहिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची काय प्रतिक्रिया होती या प्रश्नावर अमृता फडणवीस यांनी मजेदार उत्तर दिलं आहे.
मुूड बना लिया या गाण्याच्या लॉंन्चिंगदरम्याम ‘देवेंद्र फडणवीस यांनी हे गाणं पाहिलं का?’ असा प्रश्न पत्रकारांनी विचारला तेव्हा मामी म्हणाल्या की, ” हो पाहिलं. त्यांना हे गाणं खूपच आवडलं.” ‘त्यांनी या गाण्यावर डान्स केला का?’ या प्रश्नावर अमृता म्हणाल्या की, “ते ट्रोलिंगला घाबरले. पण त्यांना गाण्याबाबत सगळ्या गोष्टी आवडल्या. ते ज्या पदावर आहेत त्यानुसार निम्म्या लोकसंख्येकडून ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.”
View this post on Instagram
अमृता फडणवीस यांचे यापूर्वी देखिल काही गाणे प्रदर्शित झाले आहेत. त्यांच्या गाण्यांना सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. त्याशिवाय अनेकदा ट्रोलिगचाही सामना करावा लागत आहे. या पूर्वी त्यांनी ‘वो तेरे प्यार का गम’, ‘शिव तांडव स्रोतम’, ‘बेटिया’ सारख्या गाण्यांना चाहत्यांचा चांगला प्रतिसाद लाभला होता.
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मीच या घराची ‘सूत्रधार द बॉस’ म्हणत मंजिरीने कलात्मक पद्धतीने प्रसाद ओकला दिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
‘खान असता तर लगेच…’, एअर इंडियाच्या विमानात महिलेच्या अंगावर लघुशंका करणाऱ्यावर भडकले दिग्दर्शक