देवेंद्र फडणवीसांना कधी गाणं गाताना पाहिलंय का? कैलाश खेरने शेअर केलेला हा Video बघा

0
99
devendra fadanvis sing song
Photo Courtesy : Tweeter / Kailash kher

महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज (22 जुलै) हा वाढदिवस. देवेंद्र फडणवीस ( devendra fadnavis ) आज 52 वर्षांचे झाले. त्यांच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक राजकीय चढउतार पाहिले. तरिही त्यांनी राजकीय क्षेत्र सोडून दुसऱ्या कोणत्या क्षेत्रात उडी घेतल्याचे ऐकिवात नाही. तसे देवेंद्र फडणवीस ( devendra fadnavis Birthday ) हे एक उत्तम लेखक आहेत, मात्र ते गायक देखील आहेत, असं सांगितलं तर कुणाला त्यावर विश्वास बसणार नाही. मात्र, प्रसिद्ध गायक कैलाश खैर ( kailash kher ) याने एक व्हिडिओ शेअर केलाय ज्यात देवेंंद्र फडणवीस हे गाताना दिसत आहेत.

देवेंद्र फडणवीस ( Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis ) यांचा हा व्हिडिओ युती सरकारच्या काळातील आहे. त्यात एका कार्यक्रमात कैलाश खेर गाणे गात असताना देवेंद्र फडणवीस यांच्या शेजारी येत त्याने त्यांना गाणे गाण्याची विनंती केली. आणि फडणवीस यांनीही ‘तेरी दिवानी’ हे कैलाश खेरचे प्रसिद्ध गीत गा सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. ( devendra fadanvis sing song ) तुम्हा सर्वांना एक गोष्ट माहितीच आहेत की, देवेंद्र फडणवीस हे जरी पुर्णतः गायक नसले, तरीही त्यांचा पत्नी म्हणजेच अमृता फडणवीस या मात्र उत्तम गायिका आहेत. ( Devendra Fadnavis sing song Teri Deewani )

अधिक वाचा –
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार : ‘हे’ दोन अभिनेते ठरले सर्वोत्कृष्ठ, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी
मोठी बातमी! सलमान खानला हवीये बंदूक, पोलिसांकडे केली मागणी, वाचा सविस्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here