Monday, July 1, 2024

शहनाज गिल असे काय म्हणाली की, दुसऱ्यांना हसवणाऱ्या कपिल शर्माला देखील हसणे झाले अनावर

सामान्यपणे कलाकार कपिल शर्माच्या शोमध्ये येऊन आपले सिनेमे, म्युझिक व्हिडिओ आदी अनेक गोष्टी प्रमोट करतात. मात्र सध्या जरा उलटे चित्र पाहायला मिळत आहे. लवकरच कपिल शर्माचा बहुप्रतिक्षित असा Zwigato हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या निमित्ताने तो विविध शोमध्ये जाऊन त्याच्या या सिनेमाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. यासाठीच कपिल अभिनेत्री शहनाज गिलच्या ‘देसी वाइब्स विद शहनाज गिल’मध्ये प्रमोशनसाठी पोहचला होता. यावेळी या दोघांनी तुफान मस्ती केली आणि एकमेकांना भरपूर हसवले. शहनाजने या भागाची एक छोटी क्लिप सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केली आहे. यामध्ये या दोघांची कमाल केमेस्ट्री पाहायला मिळत आहे. यात शहनाज असे काही बोलून जाते जे ऐकून कपिल शर्मा त्याचे हसणे थांबवू शकत नाही.

शहनाजने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती म्हणते, “नक्कल करायला देखील डोक लागतं, जे सर्वांकडे नसते.” यावर कपिल शर्मा डोक हलवून हो म्हणतो. पुढे शहनाज म्हणते, “माझे तर डॉल्फिनपेक्षा जास्त आहे.” यावर कपिल शहनाजला विचारतो, “डॉल्फिनचे जास्त असते का?” त्यावर शहनाज म्हणते, “हो आता तर बोलत होतो, डॉल्फिनला जास्त डोके असते. जनावरांमध्ये सर्वात जास्त डोक डॉल्फिनला तर असते, माझे त्याच्यापेक्षा जास्त आहे.” हे ऐकून कपिल जोरजोरात हसतो, आणि शहनाजला टाळी देतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

हा व्हिडिओ शेअर करताना शहनाजने कॅप्शनमध्ये लिहिले, “कपिल शर्मा तू खूपच मस्त आहेस. हा तर फक्त ट्रेलर आहे पूर्ण भाग बघा.” तिच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या देखील भारीभारी कमेंट्स येत आहेत. नेटकऱ्यांसोबतच सेलिब्रिटींनी देखील त्याच्या या व्हिडिओवर कमेंट करत भागाची वाट बघत असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान १७ मार्च रोजी कपिल शर्माचा Zwigato हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाला कपिलने त्याच्या शोमध्ये देखील जोरदार प्रमोट केले. यासिनेमात त्याने एका फूड डिलिव्हरी बॉयची भूमिका साकारली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मोठी बातमी: अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांचा हल्ला
ये है मोहब्बतें फेम अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, गोव्यात मोठ्या दणक्यात केले लग्न

हे देखील वाचा