जया बच्चन या हिंदी चित्रपटसृष्टीतील सशक्त अभिनेत्री तसेच राजकारणी आहेत. सभागृहात विरोधी पक्षाकडून वारंवार मुद्दे मांडण्यासाठी त्या ओळखल्या जातात. जया बच्चनला पॅपराझी आवडत नाहीत. जेव्हा जेव्हा पॅपराझी त्यांच्या मागे किंवा त्यांच्या घराच्या आजूबाजूला दिसतात, तेव्हा अभिनेत्री अनेकदा त्यांच्यावर रागावलेली दिसते, ज्यासाठी अभिनेत्रीला अनेक वेळा ट्रोलही करण्यात येते. मात्र, यावेळी अभिनेत्री खूप आनंदी मूडमध्ये असल्याचं पाहायला मिळालं.
अलीकडेच फॅशन डिझायनर अबू जानी संदीप खोसला यांनी मुंबईत त्यांचा लेटेस्ट फॅशन चित्रपट मेरा नूर है मशहूरचा ग्रॅड लॉन्च इवेंट आयोजित केला होता. यावेळी बॉलिवूडचे सर्व सेलिब्रिटी पोहोचले होते. राधिका मर्चंट, नेहा धुपिया, सोनाली बेंद्रे, हुमा कुरेशी, नताशा, बाबिल, उर्फी जावेद, अर्सलान गोनी, सुझैन खान, श्वेता बच्चन नंदा तसेच जया बच्चन या कार्यक्रमात दिसल्या. यावेळी जया बच्चन चांगल्या मूडमध्ये हाेत्या.
View this post on Instagram
यादरम्यान त्यांनी मीडियासमोर पोज दिल्या आणि जेव्हा त्या निघू लागल्या, त्यावेळी त्यांनी मागे वळून प्रेमाने स्माईल दिली. यानंतर त्या पॅपराझींकडे जाऊन त्यांच्याशी बोलतानाही दिसल्या. यादरम्यान जया बच्चनने अनेक पॅपराझींसाेबत फोटोही क्लिक केले, ज्यांना त्या आधीच ओळखत होत्या आणि म्हणाल्या, “बघ मी किती हसते.”
View this post on Instagram
जया बच्चन यांचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. या व्हिडिओवर लोकांच्या खूप प्रतिक्रिया येत आहेत. एका व्यक्तिने कमेंट करत लिहिलं की, “आजचा दिवस मीडिया लोकांसाठी चांगला आहे.”, तर एकाने लिहिले, “अहो, ती पण हसते!” याआधी जेव्हा-जेव्हा जया बच्चन सार्वजनिक ठिकाणी स्पॉट व्हायच्या, तेव्हा त्या पॅपराझींवर रागावताना दिसायच्या. (designer duo abu jani sandeep khosla launch event bollywood actress jaya bachchan spotted with smile and hug paparazzi )
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘पठाण’च्या निर्मात्यांनी फॅन्सला दिली भेट, चित्रपटाच्या तिकिट खरेदीवर मिळणार ही भन्नाट ऑफर
एनएसडीमधून रिजेक्ट झाल्यानंतर नैराश्यात गेलेल्या मनोज बाजपेयींच्या मनात यायचे आत्महत्येचे विचार