Thursday, April 18, 2024

जया बच्चन यांनी उपाध्यक्ष जगदीप धनखर यांच्याकडे दाखवले बोट, राज्यसभेच्या कामकाजादरम्यान घडली घटना

ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेत्री आणि राज्यसभा खासदार जया बच्चन अनेकदा सोशल मीडियावर आपल्या रागामुळे चर्चेत असतात. कधी पॅपराझींवर तर कधी त्यांच्या चाहत्यांवर अभिनेत्री संतापताना दिसतात, त्यामुळे बहुतेक लोकांना त्यांचे वागणे आवडत नाही. अनेकदा जया बच्चन यांना त्यांच्या रागामुळे सोशल मीडियावर ट्रोल देखील केले जाते. अशातच पुन्हा एकदा राज्यसभा खासदार जया बच्चन रागामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

समाजवादी पक्षाच्या खासदारांच्या या वागण्यावर लोक ट्विटरवर जोरदार टीका करत आहेत. व्हायरल झालेला व्हिडिओ 9 फेब्रुवारीचा राज्यसभेच्या कामकाजाचा आहे. खरे तर, अदानी प्रकरणावरून संसदेत गदारोळ सुरू असतानाच, काँग्रेस राज्यसभेच्या खासदार रजनी पाटील यांना सभापतींच्या निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले. जया बच्चन यांनी काँग्रेस खासदाराच्या समर्थनार्थ बाेल्या आणि त्यांना त्यांचे स्पष्टीकरण मांडण्याची संधीही देण्यात आली नाही, असे सांगितले. यादरम्यान जया बच्चन यांनी अध्यक्षांकडे बोट दाखवले.

ट्विटर युजर्सने ट्राेल करत केल्या कमेंट
संसद भवनचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकंही खाेचक कमेंट करत आहेत. कमेंट करून एका ट्विटर युजरने जया बच्चन यांना अहंकारी म्हटले आणि जया बच्चन नेहमी का रागावतात असे लिहिले.’, तर दुसर्‍याने ट्विट करत कमेंट केले की, ‘जया बच्चन यांनी पुन्हा अहंकार दाखवला आणि संसदेत मर्यादा ओलांडली.’

याशिवाय एका युजरने ट्विटरवर लिहिले की, “जया बच्चन कधी आनंदी असतात का? त्यांच्या चेहऱ्यावर कायमचा राग असतो, नेहमी सार्वजनिक ठिकाणी भांडत असतात. त्या नेहमीच त्यांच्या चित्रपटांमध्ये एक सुंदर हसणारी मुलगी म्हणून दिसताच. मला आश्चर्य वाटते की, त्या इतक्या कडू कशामुळे होतात.'(bollywood actress jaya bacchan rajya sbaha viral video angry people asked question on social media)

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अभिमानास्पद! आर माधवनच्या मुलाने केली सुवर्ण कामगिरी; ट्वीट शेअर करत अभिनेता म्हणाला,’खूप कृतज्ञ…’

आमिर खान दिसतोय काठीच्या साहाय्याने चालताना, त्याची अवस्था पाहून तुम्हालाही बसेल धक्का

हे देखील वाचा