रॉवर आधारित बॉलिवूडमध्ये बनले ‘हे’ चित्रपट; काहींच्या सस्पेंन्सने जिंकली मने, तर काही झाले फ्लॉप


सध्या देश प्रेमावर आधारीत आणि विशेष म्हणजे रॉवर आधारित चित्रपटांचे वेध लागले आहेत. अनेक दिग्दर्शक गुप्तहेरांच्या कामगिरीवर जास्त प्रकाश टाकताना दिसत आहेत. रॉमधील गुप्तहेरांचे जीवन किती कठीण वेदनादायी असते. त्यांना आपले मिशन पूर्ण करण्यासठी कशा पद्धतीच्या समस्यांना तोंड द्यावे लागते, तसेच त्यांच्याकडे असलेले अफाट ज्ञान या सर्व गोष्टींवर आधारित अनके चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या जास्त आवडीचे असल्याचे दिसत आहे. प्रेक्षकांची आवड लक्षात घेत लवकरच सिद्धार्थ मल्होत्राचा रॉ एजंटच्या भूमिकेतला ‘मिशन मजनू’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये दाक्षिणात्य चित्रपटांतील अभिनेत्री रश्मिका मंदाना प्रमुख अभिनेत्रीच्या भूमिकेमध्ये झळकणार आहे. तिचा बॉलिवूडमधील हा पहिलाच चित्रपट आहे. नुकतेच चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले. जाणून घेऊयात बॉलिवूडमधील अशाच गुप्तहेरांच्या कहाणीवर आधारीत काही चित्रपट.

राझी
साल २०१८ मध्ये मेघना गुलजार यांचा ‘राझी’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली. या चित्रपटामध्ये आलिया भट्ट मुख्य भूमिकेमध्ये होती. लेखक हरिंदर सिक्का यांच्या ‘कॉलिंग सहमत’ या पुस्तकावर आधारित ‘राझी’ चित्रपटाची कथा आहे. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. यामध्ये एक रॉ एजंट असलेल्या मुलीचे आयुष्य दाखवण्यात आले आहे. तसेच या चित्रपटामधील ‘दिलबरो’ या गाण्याने अनेक प्रेक्षकांचे डोळे पाणावले. चित्रपटामध्ये आलियाने आपल्या अभिनयाला पूर्ण पणे न्याय दिला आहे. (Detective films: These great films have been made on RAW, someone won the heart with suspense and someone flopped)

एजंट विनोद
सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या ‘एजंट विनोद’ या चित्रपटाने देखील प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीराम राघवन यांनी केले आहे. हा एका गुप्त मिशनवर आधारित चित्रपट आहे. आपल्या मित्रांसह आतंकवादी हल्ल्याला कसे थांबवले हे यामध्ये दाखवण्यात आले आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगलाच विक्रम केला होता. तब्बल ७३ कोटींहून जास्त कमाई या चित्रपटाने केली होती. प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला.

रोमियो अकबर वॉल्टर
साल २०१९ मध्ये प्रकाशित झालेला ‘रोमियो अकबर वॉल्टर’ हा चित्रपट बँक कॅशिअर रोमियोच्या कहाणीवर आधारित होता. यामध्ये भारतीय इंटेलिजेंस एजेंसीसाठी पाकिस्तानात राहून माहिती पुरवली जात असल्याचं दाखवण्यात आले होते. रॉबी ग्रेवाल यांच्या या चित्रपटाला प्रेक्षांची खूप पसंती मिळाली. यामधील जॉनची भूमिका प्रेक्षांच्या मनात बसली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फार कमाई नाही केली, परंतु या चित्रपटाची कथा बघण्याजोगी आहे.

एक था टाइगर
साल २०१५ मध्ये सलमान खान आणि कॅटरिना कैफच्या या चित्रपटाने तर रसिक प्रेक्षकांना वेडच लावले होते. या चित्रपटामध्ये सलमानच्या ऍक्शनने लाखो चाहत्यांना भुरळ घातली होती. रॉवर आधारित खूप मोठ्या प्रमाणावर हिट झालेला हा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५६५ कोटींची कमाई केली. आदित्य चोप्रा दिग्दर्शित या चित्रपटामध्ये सलमान आणि कॅटरिनाच्या जोडीला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले.

टाइगर जिंदा है
कबीर खान दिग्दर्शित ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट सलमानच्या ‘एक था टायगर’चा दुसरा भाग आहे. या चित्रपटामध्ये सलमान आणि कॅटरिना दोघांनी दमदार अभिनय केला. या चित्रपटाने आधीचे सर्व विक्रम मोडत बॉक्स ऑफिसवर ५६५ कोटींहून जास्त कमाई केली. साल २०१७ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये अतिरेकी हल्ल्यापासून सलमानने बाकीच्यांना आणि स्वतःला कसे वाचवले तसेच तो रॉच्या हातून देखील कसा निसटला हे खूप उत्तम प्रकारे दाखवण्यात आले आहे.

मद्रास कैफे
तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित हा चित्रपट बनवण्यात आला. या चित्रपटाचे दिग्दर्शन शूजित सरकार यांनी केले होते. साल २०१३ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

या चित्रपटामध्ये जॉन अब्राहम एका गुप्त मिशनसाठी श्रीलंकेला जातो. चित्रपटामध्ये त्याने दमदार भूमिका साकारली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ६७ कोटींची कमाई केली. प्रेक्षकांनी या चित्रपटाला देखील खूप पसंती दिली होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सलमान, शाहरुख अन् आमिर घाबरतात कारण…’, नसिरुद्दीन शाह यांनी साधला तिन्ही खानांवर निशाणा

-‘शिवगामीदेवी’ची भूमिका साकारून मेगास्टार झाल्या रम्या; बॉलिवूडमध्ये बोल्ड सीन्ससाठी सतत असायच्या चर्चेत

-OMG! यामी गौतमच्या चेहऱ्याची ही काय झाली हालत, पाहून तुमच्याही अंगावर येतील शहारे


Leave A Reply

Your email address will not be published.