Thursday, March 28, 2024

जेव्हा इंग्रजी न आल्यामुळे देव आनंद यांनी उडवली मधुबालाची खिल्ली, अभिनेत्रीने उचलले होते मोठे पाऊल

देवआनंद (Dev Anand) आणि मधुबाला (Madhubala) ही भारतीय चित्रपटसृष्टीतील अशी दोन नावे आहेत, ज्यांनी त्यांच्या काळात बॉलिवूडवर राज्य केले. दोघांनी ‘काला पानी’, ‘आराम’, ‘मधुबाला’ यांसारख्या अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. त्यांचे चाहते आजही त्यांचे चित्रपट मोठ्या उत्सुकतेने पाहतात. विशेष बाब म्हणजे देव आनंद आणि मधुबाला यांच्या जीवनाशी संबंधित अनेक कथा बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहेत, ज्याबद्दल प्रेक्षकांना जाणून घ्यायला आणि वाचायलाही आवडते. मधुबालाला इंग्रजी भाषेचे ज्ञान नव्हते, हे फार कमी लोकांना माहीत आहे. त्यांना फक्त उर्दू भाषा येत होती. एकदा देव आनंद यांनी मधुबालाला इंग्रजीबद्दल असे काही बोलले की, त्यानंतर अभिनेत्रीनेही इंग्रजी शिकण्याचा निर्णय घेतला.

हा किस्सा १९५० सालचा आहे, जेव्हा देव आनंद आणि मधुबाला ‘आराम’ चित्रपटाचे शूटिंग करत होते. एकदा देव आनंदचा एक मित्र चित्रपटाच्या सेटवर अभिनेत्याला भेटायला आला. देव साहेबांना इंग्रजीत बोलण्याची सवय होती, त्यामुळे ते त्यांच्या मित्राशीही इंग्रजीत बोलत. संभाषणात मधुबालाचा उल्लेखही आला. मधुबालाने त्यांचे नाव ऐकले पण त्यांच्याबद्दल काय बोलले जात आहे, हे त्यांना समजले नाही. त्यामुळेच मधुबाला वाट पाहत होत्या की, चर्चा कधी संपेल आणि त्या देवशी बोलतील. याबद्दल त्यांना विचारल्यानंतर प्रश्न ऐकून देव साहेब आधी हसले आणि मग त्यांनी उत्तर दिले की काही नाही, “ते फक्त तुझ्याबद्दल विचारत होते. तुझ्या कामाबद्दल मी कौतुक केले आणि त्याला सांगितले की तू एक मेहनती कलाकार आहेस.” मात्र हे सगळे त्यांना खोटे वाटू लागले.

अभिनेत्रीने देव आनंद यांना प्रश्न केला आणि म्हणाल्या की, “नाही, असे काही नाही. तुम्ही खरी गोष्ट लपवत आहात.” मधुबालाची सुटका करण्यासाठी, “तुमचा विश्वास नसेल तर मी काय करू,” असे ते म्हणाले. “आम्ही तुमच्याबद्दल वाईट बोललो असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही इंग्रजी का शिकत नाही”, असे म्हणत त्यांनी खिल्ली उडवली. देव आनंद यांची हीच गोष्ट मधुबालाच्या मनाला लागली. त्यानंतरच त्यांनी इंग्रजी शिकण्याचा निर्णय घेतला. इतकेच नाही तर मधुबालाने ठरवले की, त्या आता देव आनंद यांच्याशी इंग्रजी शिकूनच बोलतील.

यानंतर मधुबाला रोज सेटवर एक इंग्रजी पुस्तक वाचायच्या. देव आनंद त्यांना दुरून पाहून हसायचे. तर मधुबालाला असे वाचताना पाहून सेटवरील लोकंही त्यांची खिल्ली उडवायला लागली. दरम्यान, एके दिवशी प्रसिद्ध कथाकार बाबूराव पटेल यांच्या पत्नी सुशीला राणी सेटवर पोहोचल्या. मधुबालाची इंग्रजी शिकण्याची आवड पाहून त्यांना खूप आनंद झाला आणि मग त्यांनी मधुबालाला इंग्रजी शिकवण्याचे ठरवले. मधुबाला काही महिन्यांतच इंग्रजी बोलायला शिकल्या. तेव्हाच त्यांनी देव साहेबांशी संवाद साधला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा