Tuesday, March 5, 2024

दिलीप कुमार आणि मधुबाला प्रेमकहाणी: फक्त एका हट्टामुळे तुटली बॉलिवूडची सर्वात रोमॅंटिक आणि चर्चित प्रेमकहाणी

बॉलिवूडच्या एवढ्या मोठ्या इतिहासात अनेक जोड्या या आयकॉनिक ठरल्या. आपल्या कमाल केमिस्ट्रीमुळे या जोड्यांची प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. या अनेक जोड्यांमध्ये दिलीप कुमार आणि मधुबाला ही जोडी नेहमीच उजवी आणि वेगळी ठरली. या जोडीचे फॅन्स आजही आपल्याला पाहायला मिळतात. या जोडीचे सिनेमे आणि त्यांची प्रेमकहाणी आजही अतिशय उत्सुकतेने ऐकली जाते. या दोघांची जोडी पडद्यावर जितकी उठून आली तितकीच पडद्यामागे देखील हिट ठरली. आजही बॉलिवूडमध्ये सरावात सुंदर, गाजलेली प्रेमकहाणी कोणती हे कोणी विचारले तर पहिले नाव दिलीप कुमार आणि मधुबाला यांचेच येईल. मात्र दुर्दैवाने यांचे प्रेम पूर्ण झाले नाही आणि, या दोघांची प्रेमकहाणी तब्बल नऊ वर्ष चालली आणि एका दुःखद वळणावर येऊन तिचा शेवट झाला. पुढे दिलीप कुमार यांनी सायरा बानो यांच्याशी लग्न केले, सायरा या त्यांच्यासोबत शेवट्पर्यंत राहिल्या. तर मधुबाला यांनी किशोर कुमार यांच्याशी लग्न केले.

एका माहितीनुसार मधुबाला आणि दिलीप कुमार यांची पहिली भेट ‘तराना’ सिनेमाच्या सेटवर झाली. त्यानंतर दोघांच्या भेटी होऊ लागल्या आणि त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. तेव्हा मधुबाला या केवळ 18 वर्षांच्या होत्या तर दिलीप साहेब 29 वर्षांचे होते. मधुबाला या एवढ्या सुंदर होत्या की त्याकाळातील प्रत्येक व्यक्ती त्यांच्याकडे आकर्षित व्हायचा. एका रिपोर्टनुसार ग्वालियर येथे एका सिनेमाची शूटिंग चालू होती आणि तेव्हाच काही गुंडानी सेटवर असणाऱ्या महिलांसोबत चुकीचे वर्तन करत त्यांचे कपडे फाडले. त्यात मधुबाला या देखील होत्या. त्या घटनेनंतर मधुबाला यांच्या वडिलांनी शुटिंगचे लोकेशन बदलण्यासाठी सांगितले. मात्र दिग्दर्शकांना लोकेशन बदलायचे नव्हते.

पुढे हे प्रकरण एवढे वाढले की थेट कोर्टात पोहचले. त्यात दिलीप कुमार यांनी कोर्टात दिग्दर्शकांची साथ दिली. तेव्हा दिलीप कुमार आणि मधुबाला नात्यात होते. मात्र या घटनेनंतर त्या दोघांमध्ये दरी निर्माण झाली. एका मुलाखतीमध्ये मधुबाला यांच्या बहिणीने सांगितले की, ‘मधुबाला यांची इच्छा होती की, दिलीप कुमार यांनी त्यांच्या वडिलांची माफी मागावी. दोघांचे फोनवर बोलणे देखील झाले. तेव्हा दिलीप कुमार म्हणाले, ‘तू तुझ्या वडिलांना सोडून दे मी तुझ्याशी लग्न करेल.’ दोघेही त्यांच्या अति धरून होते आणि यातच त्यांचे नाते संपुष्टात आले.

या केसनंतर मधुबाला आणि दिलीप कुमार यांनी हिंदी सिनेमातील आयकॉनिक चित्रपट असलेल्या मुघल-ए-आझम सिनेमात काम करत पडद्यावर सलीम आणि अनारकली यांची कमालीची सुंदर प्रेमकथा पडद्यावर उतरवली. मात्र तोपर्यंत त्यांचे नाते बिघडले होते. सेटवर ते दोघं एकमेकांशी बीओल्ट देखील नव्हते. सलीम आणि अनारकली यांचे प्रेम कायम राहिले असले तरी दिलीप कुमार आणि मधुबाला यांची प्रेमकहाणी संपली होती.

अधिक वाचा-
प्रिया बापटचा हॉट लूक व्हायरल, फोटो बघून चाहते म्हणाले…
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत झळकणार महाराष्ट्राची लाडकी अप्सरा; ‘या’ चित्रपटात दिसणार अभिनेत्री

हे देखील वाचा