Tuesday, June 24, 2025
Home बॉलीवूड अमृता फडणवीस पुन्हा ट्रोल, नेटकरी म्हणाले…..’मामी उर्फी जावेदचं मार्केट जाम करणार’

अमृता फडणवीस पुन्हा ट्रोल, नेटकरी म्हणाले…..’मामी उर्फी जावेदचं मार्केट जाम करणार’

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच चर्चेत असतात. अनेकवेळा त्यांच्या वक्तव्यामुळे तर काही वेळा त्याच्या गाण्यामुळे त्याचं कौतुकही होत. तर कधी त्यांना ट्रोलही केलं जात. तसेच अमृता फडणवीसांना गाण्याची आवड आहे. त्याचप्रमाणे त्या सोशल मीडियावर सक्रिय असतात. काही दिवसांपूर्वीच अमृता फडणवीस यांचे ‘मूड बना लिया’ गाणं प्रदर्शित झालं. त्यांच्या या गाण्याला युट्यूबवर 50 मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले. त्या विविध प्रकारच्या कार्यक्रमांना हजेरी लावत असतात. तसेच त्या अनेक मुद्द्यांवर त्यांचं मतंही मांडत असतात. अलीकडेच त्यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कायक्रमातील काही फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यांनी या कार्यक्रमात एक डिझायनर ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसवरचा फोटो त्यांनी सोशल मिडीयावर शेअर केला. पण त्यांना या ड्रेसमुळे त्यांना जबरदस्त ट्रोल केले जात आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी घातलेल्या कुर्त्यावरून त्यांना ट्रोल केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Fadnavis (@amruta.fadnavis)

 

या फोटोला 9000 पेक्षा जास्त लाइक्स आणि 100 पेक्षा जास्त कमेंट्स आल्या आहेत. यात एका नेटकऱ्याने कमेंट केली की, ‘अमृता फडणवीस आता उर्फी जावेदचं मार्केट जाम करणार’. तर दुसऱ्या एका सोशल मिडिया युजरने त्यांना ‘गरिबांची उर्फी जावेद’ असं म्हटलंय. तर काहींनी अमृता फडणवीस सुंदर दिसत असल्याचं म्हटलं आहे. (devendra-fadnavis-amrita-fadnavis-trolled-beacuse-wearing-designer-dress)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठक यांनी इंडस्ट्रीपासून दूर राहण्याचे सांगितले धक्कादायक कारण, एकदा वाचाच
धक्कादायक! ए.आर. रहमान यांचा मुलगा अमीन याच्यासोबत मोठा अपघात; 3 दिवसानंतरही गायक शॉकमध्ये

हे देखील वाचा