छोट्या पडद्यावरील ‘देवमाणूस’ ही मालिका आजकाल बरीच चर्चेत असते. मालिकेची कथा, त्यातील रंजक वळणं सर्वकाही प्रेक्षकांना त्यांच्याशी बांधून ठेवत आहे. त्यामुळेच या मालिकेची लोकप्रियता या दिवसात गगनाला भिडली आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. यातील सर्व पात्रांना चाहत्यांकडून अमाप प्रेम मिळत आहे. या कलाकारांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री अतिशय उत्तम आहे. त्याचप्रमाणे त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्री देखील चाहत्यांकडून पसंत केली जात आहे.
अलीकडेच यातील कलाकारांचा एक ऑफस्क्रीन व्हिडिओ समोर आला आहे, जो चाहत्यांमध्ये चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ झी मराठीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, बज्या, नाम्या आणि चंदा जबरदस्त डान्स करत आहेत. यात ते ज्याप्रकारे एन्जॉय करत नाचत आहेत, ते खरोखरच पाहण्यासारखे आहे. या व्हिडिओमधील त्यांच्या डान्स स्टेप्सपाहून तुम्ही देखील त्यांचे कौतुक केल्या शिवाय राहू शकणार नाहीत.
विशेष म्हणजे ऑनस्क्रीन हे कलाकार जितकी गंभीर पात्रं साकारतात, तितकीच मजा ते कॅमेऱ्याच्या मागे करत आहेत. हा धमाकेदार डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. नेटकरी व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
महत्वाचे म्हणजे, ‘देवमाणूस’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अगदी कमी कालावधीत या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. अशामध्ये आता ही मालिका बंद होणार असल्याने चाहत्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-रूबीना दिलैकच्या नवीन गाण्याला भरभरून प्रतिसाद; अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत मानले चाहत्यांचे आभार
-आनंदाची बातमी! अभिनेत्री नयनताराने केली साखरपुड्याची पुष्टी; जाणून घ्या कोण आहे तो नशीबवान?
-सोनू अभिनेत्रीसोबत करत होता ‘तुम तो ठहरे परदेसी’ गाण्यावर डान्स; मध्येच आला चाहता आणि…










