मुहूर्त ठरला! ‘या’ तारखेपासून ‘देवमाणूस २’ मालिका करणार प्रेक्षकांचे मनोरंजन


झी मराठीवर एका मालिकेने या वर्षी चांगलेच प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ती मालिका म्हणजे ‘देवमाणूस’. या मालिकेने काहीच महिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. नंतर काही अवधीतच मालिकेने निरोप घेतला. मालिकेतील सगळीच पात्र अफलातून होती. सत्यघटनेवर आधारित असलेल्या या मालिकेला प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घेतले. मालिकेचा प्रोमो पाहून मालिका खूपच भयानक असणार असे अनेकांना वाटले होते. परंतु मालिका ज्याप्रकारे प्रेक्षकांसमोर आली, त्यामुळे सगळेच खूप खुश झाले होते.

मालिकेत किरण गायकवाड हा अभिनेता मुख्य भूमिकेत होता. त्याने याआधी ‘लागीर झालं जी’ या मालिकेत देखील नकारात्मक पात्र निभावले होते. त्यामुळे या मालिकेत देखील त्याचे पात्र तसेच असेल असे सगळ्यांना वाटले होते. परंतु मालिकेत त्याचे पात्र नकारात्मक असले, तरी सगळ्यांना आवडले होते. त्याने या मालिकेत डॉक्टर अजित कुमारदेव ही भूमिका निभावली होती. त्याच्या व्यतिरिक्त मालिकेतील डिंपल, बज्या, टोण्या, नाम्या आणि खास करून सरु आजी ही पात्र प्रेक्षकांना खुप भावली होती. मालिकेत त्यांनी अत्यंत खुमासदार पद्धतीने अभिनय करून सगळ्यांचे मनोरंजन केले होते.

मालिकेने काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिकेने निरोप घेतला परंतु मालिकेचा शेवट अनुत्तरित राहिल्याने मालिका पुन्हा एकदा भेटीला येईल अशी सगळ्यांना आशा होती. प्रेक्षकांची हीच इच्छा आता काही दिवसातच पूर्ण होणार आहे. ‘देवमाणूस २’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेचे प्रोमो मागील अनेक दिवसापासून सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

प्रोमो पाहून सगळ्यांच्या मनातील उत्सुकता पराकोटीला गेली. अशातच सरु आजीचा एक प्रोमो समोर आला आहे. डॉक्टरांचे पहिले पुण्यस्मरण असते. तेव्हा ती तिचे डायलॉग बोलत येते आणि त्याचा पोस्टर फाडते. हा प्रोमो पाहून सगळेजण सरु आजीला पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. ही मालिका १९ डिसेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री १० : ३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!