बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितने आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये जे स्थान निर्माण केले आहे, त्याला तोडच नाहीये. एक उत्कृष्ट अभिनेत्री आणि डान्सर म्हणून तिने आपले नाव कमावले आहे. या सगळ्या गोष्टी करताना तिने तिच्या कुटुंबाकडे मात्र कधी दुर्लक्ष केले नाही. ती तिच्या वैयक्तिक आयुष्यात एक उत्तम आई आणि पत्नी आहे, याची प्रचिती तिने नुकत्याच शेअर केलेल्या तिच्या फोटोवरून येते.
माधुरी दीक्षितचा मोठा मुलगा अरिन नेने याचा बुधवारी (17 मार्च) वाढदिवस होता. त्याने वयाची 18 वर्षे पूर्ण केली आहेत. त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तिने त्यांचे काही थ्रोबॅक फोटो शेअर केले आहेत, तसेच त्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तारुण्यात पदार्पण केलेला अरिन आजही त्याच्या आई- वडिलांचा खूप लाडका आहे. माधुरीने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत येणाऱ्या जबाबदारीचीही जाणीव करून दिली आहे.
अरीनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत माधुरीने लिहिले आहे की, “माझा मुलगा आता अधिकृतपणे तारुण्यात प्रवेश करत आहे. हॅप्पी बर्थडे अरिन. फक्त एवढंच लक्षात ठेव की, स्वतंत्र आयुष्यासोबत जबाबदारी देखील येते. आजपासून हे संपूर्ण जग तुझं आहे. त्या दुनियेचा आनंद घे, आणि स्वतःचं आयुष्य उज्ज्वल बनव. तुझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक वेळेचा वापर करून घे, आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने जग. मी अशी आशा करते की तुझ्या आयुष्याचा प्रवास खूप यादगार असेल, खूप प्रेम.”
माधुरीच्या या पोस्टवरून ही गोष्ट लक्षात येते की, ती तिच्या मुलासोबत एक आई म्हणून नाही, तर एक चांगली मैत्रीण म्हणून वागते. तिने इंस्टाग्रामवर त्यांचे काही फोटो शेअर केले आहेत. यात त्यांच्यातील बॉडिंग दिसून येते. माधुरीने लॉकडाऊनमध्ये कुटुंबासोबत अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यात अरिनची प्रतिभा सर्वांनीच पाहिली आहे.
एका व्हिडिओमध्ये अरिन तबला वाजवताना दिसत आहे. त्याच्या तबल्याच्या तालावर माधुरीने ठेका धरला होता . अशाप्रकारे तिने तिच्या मुलांमधील प्रतिभा सर्वांना दाखवली होती. माधुरीने 1999 मध्ये डॉक्टर श्रीराम नेने यांच्यासोबत लग्न केले होते. त्यांना दोन मुले आहेत. मोठा मुलगा अरिन 18 वर्षाचा झाला आहे, आणि छोटा मुलगा रायन 16 वर्षाचा आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-बच्चन कुटुंबाची लेक असूनही राहिली लाईमलाईटपासून दूर, बिग बींनी वाढदिवशी केले थ्रोबॅक फोटो शेअर
-सुपरस्टार महेश बाबूच्या ‘या’ सिनेमाचा टिझर रिलीझ, चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या उत्सुकतेने गाठले शिखर
-अगं बाई मोडशील ना!! डोक्यावर उभे राहून मलायकाने केला प्रेक्षकांना नमस्कार