बिग बॉस मराठी सीजन 5 चा ग्रँड फिनाले दणक्यात चालू झालेला आहे. आत्तापर्यंत घरातील दोन स्पर्धक घराबाहेर गेलेले आहेत. जानवी किल्लेकर आणि अंकिता प्रभू वालावलकर हे घरातून बाहेर गेलेले आहेत. आणि नुकतेच घरातून तिसरे इव्हीक्शन झालेले आहे. प्रेक्षकांनी दिलेल्या कमी मतानुसार धनंजय पोवार हा बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडलेला आहे आणि आता या बिग बॉसला टॉप थ्री स्पर्धक मिळालेले आहे. बिग बॉस मराठीचा टॉप थ्री मध्ये सध्या निक्की तांबोळी, सुरज चव्हाण आणि अभिजीत सावंत हे आहेत. आता बिग बॉस मराठी 5 ची ट्रॉफी कोणाला मिळते याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.