Monday, July 1, 2024

युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने पार्कमध्ये केला जबरदस्त डान्स, व्हिडिओ पाहून तुम्हीही थिरकाल

भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहलची पत्नी आणि प्रसिद्ध यूट्यूबर धनश्री वर्माने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. धनश्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती बर्‍याचदा तिच्या डान्सचे व्हिडिओ शेअर करत असते, त्यामुळे ती बर्‍याच वेळा चर्चेतही येते. तिचे डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर खूप जास्त व्हायरल होत असतात. तिचे आत्ता दोन व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती पार्कमध्ये नाचताना दिसत आहे, तर दुसऱ्या व्हिडिओत ती मोकळ्या मैदानात मैत्रीणींसोबत नाचत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

धनश्री वर्माने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, एका पार्कमध्ये युझवेंद्र चहल याची पत्नी धनश्री वर्मा इंग्रजी गाण्यावर जोरदार नाचत आहेत. या व्हिडिओमध्ये ती खूप हटके दिसत आहे.

तर दुसऱ्या व्हिडिओत ती आपल्या मैत्रिणींसोबत डान्सचा आनंद लूटत आहे. एका मोकळ्या मैदानात ती वैशाली आणि पायल यांच्यासमवेत  ‘छम्मा छम्मा’ यावर फोक डान्स करत आहे. या तिघीपण सारख्याच कपड्यांमध्ये असून खूप सुंदर दिसत आहेत. या व्हिडिओला बघताना त्यांच्या कानातल्याकडे लक्ष जाते, जे खूप वेगळे आणि हटके दिसत आहे.

या डान्समध्ये तिने सुंदर एक्सप्रेशन दिले आहेत. नेटकऱ्यांना हा व्हिडिओ खूपच आवडलाय. या आधी पण तिने बरेच व्हिडिओ शेयर केले आहेत, ज्यात ती एका व्हिडिओमध्ये भांगडा डान्स करताना दिसून येत आहे. जो कमालीचा गाजला होता. धनश्री वर्माने यापूर्वीही तिच्या लग्नाचा व्हिडिओ शेअर केला होता.

धनश्री वर्मा हिचे ‘ओये होये होये’ हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ती पेशाने डॉक्टर आहे, पण नृत्याच्या माध्यमातून तिने आपली जबरदस्त ओळख निर्माण करण्यात कसलीही कसर सोडली नाही आहे. धनश्री वर्माच्या इंस्टाग्रामवर फॉलोअर्सची संख्या २० लाखांहून अधिक आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या सूनेने दिला ‘जवानी जानेमन’ गाण्यावर हटके परफॉर्मन्स, तेवढ्यात को- स्टारने केले ‘असे’ काही

-काजोल बनली ‘निंजा हातोडी!’ हवेत उडवत तिने केले सफरचंदाचे दोन भाग; काहींनी दिली पसंती, तर काहींनी केलं ट्रोल

-राकेश मिश्राच्या गाण्यातील आकांशा दुबेच्या बोल्ड अदा पाहून प्रेक्षक झाले फिदा, मिळाले ८ कोटींपेक्षाही अधिक हिट्स

हे देखील वाचा