Tuesday, June 10, 2025
Home अन्य मुलगी असावी तर अशी! ‘ताल से ताल मिला’ गाण्यावर युझवेंद्र चहलची पत्नी धनश्रीने लावले आईसोबत ठुमके, पाहा व्हिडिओ

मुलगी असावी तर अशी! ‘ताल से ताल मिला’ गाण्यावर युझवेंद्र चहलची पत्नी धनश्रीने लावले आईसोबत ठुमके, पाहा व्हिडिओ

भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल याची पत्नी धनश्री वर्मा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिच्या व्हिडिओला चाहत्यांकडूनही भरभरून प्रतिसाद मिळत असतो. पुन्हा एकदा धनश्रीने तिचा एक डान्स व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. यासह तिने तिच्या चाहत्यांची मने जिंकली आहेत. धनश्रीची सोशल मीडियावर चांगली फॅन फॉलोविंग आहे. हा व्हिडिओ पाहून, चाहत्यांनी धनश्रीचं भरपूर कौतुक केलं आहे, तर व्हिडिओवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पडला आहे. तिचा डान्स व्हिडिओ येताच, सोशल मीडियावर लोकप्रिय झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती आपल्या आईबरोबर नाचताना दिसत आहे.

व्हिडिओ बघून हे लक्षात येते की, आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाच्या निमित्ताने धनश्री वर्मा तिच्या आईबरोबर नाचताना दिसली आहे. व्हिडिओमध्ये आई आणि मुलीने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. ज्यात त्या दोघीपण खूप सुंदर दिसत आहेत. दोघी डान्स व्हिडिओमध्ये, ‘ताल से ताल मिला’ गाण्यावर नाचताना दिसत आहे. आई आणि मुलगी दोघीपण तोडीस तोड नाचताना दिसत आहेत. त्यांचे हावभाव पण कमालीचे सुंदर दिसत आहेत.

व्हिडिओ शेअर करत धनश्रीने ‘हॅप्पी इंटरनॅशनल डान्स डे’ सोबत कॅप्शनमध्ये आईसाठी लिहिले की, ‘तू नेहमीच माझी आवडती डान्स पार्टनर आहेस.’ धनश्रीच्या या व्हिडिओवर चाहते मोठ्या प्रमाणात पसंत करीत आहेत. यासह धनश्री वर्माचा हा आईसोबतचा व्हिडिओ कलाकारांनाही खूप आवडला आहे.

धनश्री ही एक डॉक्टर, आणि एक उत्तम कोरियोग्राफर आहे. परंतु तिला डान्सची प्रचंड आवड असल्याने, ती तिचे निरनिराळे व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. काही महिन्यांपूर्वी धनश्री ‘ओये होये होये’ गाण्यामध्ये झळकली होती. तिच्या या गाण्याला देखील चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. सन २०२०मध्ये धनश्रीने युझवेंद्र चहलशी लग्न केले, आणि लग्नानंतर धनाश्री आणखी चर्चेत आली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-काय सांगता! अभिनेत्री अनुष्का शर्माने दिले होते आमिर खानच्या ‘या’ चित्रपटासाठी ऑडिशन; जुना व्हिडिओ व्हायरल

-‘नृत्याने अंधार आणि वेदनाविरुद्ध लढण्यास मिळते मदत’, म्हणत अभिनेत्री संदीपा धरने नृत्य दिनानिमित्त केला आयुष्यातील मोठा खुलासा

-रेमो डिसूजाने पत्नी लिजेलसोबत केला मजेशीर व्हिडिओ शूट, पाहून तुम्हीही खदखदून हसाल

हे देखील वाचा