Thursday, April 24, 2025
Home कॅलेंडर स्पोर्टी लुकमध्ये धनश्री वर्मा-चहलचा ‘तितलियां वर्गा’ गाण्यावर जबरा डान्स, तब्बल २५ लाख हिट्सचा टप्पा केलाय पार

स्पोर्टी लुकमध्ये धनश्री वर्मा-चहलचा ‘तितलियां वर्गा’ गाण्यावर जबरा डान्स, तब्बल २५ लाख हिट्सचा टप्पा केलाय पार

पंजाबी सिंगर हार्डी सिंधू त्याच्या आवाजामुळे अनेक लोकांच्या मनात घर करून आहे. नुकतेच हार्डीचे एक नवीन गाणे यूटुबवर आले असून ते जबरदस्त हिट झाले आहे. ‘तितलियां वर्गा’ असे गाण्याचे बोल असून हे गाणे यूटुबवर ट्रेडिंगमध्ये तिसऱ्या नंबर आहे. हार्डी सिंधू सोबत या गाण्यात सरगुन मेहता देखील आहे. या गाण्याला वीस मिलियन पेक्षा जास्त व्हीयूज मिळाले आहेत. या गाण्यावर अनेक डान्स ग्रुप त्यांचा परफॉर्मन्स देत आहेत. यात आता अजून ऐका डान्स ग्रुपची भर पडली आहे. हा डान्स ग्रुप आहे धनश्री वर्मा -चहलचा.

धनश्री नेहमी तिचा सोलो डान्स व्हिडिओ तयार करत असते. मात्र यावेळी तिने एका ग्रुपसोबत हा व्हिडिओ तयार केला आहे. धनश्रीने तीनच दिवसांपूर्वी अपलोड केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत २५ लाखांपेक्षा जास्त व्हिव्ज मिळाले आहेत. हा व्हिडिओ पोस्ट करतांना तिने लिहिले आहे की, ‘तर सांगा आहे का यात आग?’ धनश्रीचा हा डान्स व्हिडिओ इंटरनेटवर जबरदस्त हिट होत असून, सोबतच धनश्रीच्या डान्सचे कौतुक देखील होत आहे.

ह्या व्हिडिओची स्तुती करतांना लोकं आणि धनश्रीचे फॅन्स खूप मस्त कमेंट्स येत आहे. एका युजरने लिहिले आहे की, युजवेंद्रला देखील नाचवा, सोबतच सरगुन मेहता आणि प्रसिद्ध कोरियोग्राफर धर्मेश यांनी देखील या व्हिडिओवर कमेंट केली आहे. सरगुनने लिहिले, ‘आई लव यू अँड लव थीस व्हिडिओ’, तर धर्मेंशने लिहिले, ‘खतरनाक’.
तत्पूर्वी २२ डिसेंबर २०२० ला युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांनी दिल्लीमध्ये लग्न केले. लग्नानंतर ही दोघे दुबईला फिरायला गेले होते. धनश्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असून ती नेहमी तिचे आणि युजवेंद्रचे फोटो, तिच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

 

हे देखील वाचा