Friday, July 5, 2024

जोडी जबरदस्त! पत्नी धनश्री वर्माला उड्या मारताना पाहून युझीही मारू लागला उड्या, विचारल्यावर सांगितले ‘हे’ कारण

भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी  धनश्री वर्मासह आयपीएल सुरू होण्यापूर्वी दर्जेदार वेळ घालवत आहे. दोघेही सतत त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. दरम्यान, धनश्री वर्माने पुन्हा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती युझवेंद्रसोबत नाचत उड्या मारत आहे. तसेच, ते एकमेकांना विचारत याची कारणेही ते देत आहेत. चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.

धनश्री वर्माने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये, तिला उड्या मारताना पाहून चहलसुद्धा उडी मारायला लागला, असे दिसून येत आहे. मग दोघेही एकमेकांना विचारतात की, ते असे का करत आहेत.

धनश्री वर्माने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहले आहे, “डान्सर स्टाईल जंप असो वा क्रिकेटर्स स्टाईल जंप, जंप करा! कारण जेव्हा जेव्हा तुम्ही उड्या मारणार, तेव्हा तुमच्यामुळे एखाद्याला चालण्याची संधी मिळेल. आदित्य बिर्ला ग्रुप हेल्थ इन्शुरन्स प्रत्येक 10 हजार उड्यांवर गरजूंना एक कृत्रिम पाय देणगी म्हणून देईल. त्यामुळे तुम्हीही यात सहभागी व्हावे.”

धनश्री वर्माने काही दिवसांपूर्वी ‘ओये होये होये’ हे गाणे रिलीझ केले आहे. या गाण्यातील धनश्री वर्मा आणि जस्सी गिलची केमिस्ट्री अगदी पाहण्यासारखी आहे. खरं तर धनश्री वर्मा व्यवसायाने एक डॉक्टर आहे. पण डान्सच्या माध्यमातून तिने आपली जबरदस्त ओळख निर्माण करण्यात कसलीही कसर सोडली नाही. धनश्री वर्माच्या इंस्टाग्राम फॉलोअर्सची संख्या 34 लाखांहून अधिक आहे, तर यूट्यूबवर तिच्या सबस्क्रायबर्सची संख्याही 20 लाखांच्या पार गेली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लहान मुलांना बर्गर वाटून तरुणाने जिंकली सर्वांची मने, ‘बारिश की जाए’ गाण्यावरही लावले ठुमके; गायक बी प्राककडून व्हिडिओ शेअर

-‘ब्रोकन बट ब्युटीफुल!’ सिद्धार्थ शुक्लाच्या किसिंग सीनला चाहत्यांची पसंती; मात्र शहनाजचे चाहते झाले निराश

-‘मी परफेक्ट नाहीये’, लूकबद्दल प्रश्न उपस्थित केल्यानंतर अनुष्काने दिले होते प्रत्युत्तर

हे देखील वाचा