ऐश्वर्या रजनीकांत आणि धनुष त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. अलीकडेच हे दोघेही चेन्नईतील फॅमिली कोर्टात पहिल्यांदा हजर झाले. 2022 मध्ये सोशल मीडियावर विभक्त झाल्याची घोषणा केल्यानंतर या जोडप्याने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. काही काळापूर्वी सोशल मीडियावर असा दावा करण्यात आला होता की, दोघे पुन्हा एकत्र एक नवी सुरुवात करू शकतात. हे दोघेही तीनवेळा सुनावणीला हजर न राहिल्याने असा अंदाज बांधण्यात आला. मात्र, आज म्हणजेच 21 नोव्हेंबर रोजी दोघांनीही कोर्टात आपला इरादा व्यक्त केला आणि वेगवेगळ्या वाटांवर पुढे जायचे असल्याचे सांगितले.
घटस्फोट प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांनी या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ नोव्हेंबर रोजी ठेवली आहे. या तारखेला अंतिम निर्णयही दिला जाण्याची शक्यता आहे. ऐश्वर्या आणि धनुष कोर्टात हजर असताना मास्क घातलेले दिसले.
ऐश्वर्या आणि धनुषने २००४ मध्ये चेन्नईमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केले. 17 जानेवारी, 2022 रोजी, धनुष आणि ऐश्वर्याने त्यांच्या विभक्त होण्याचा निर्णय शेअर करत एक संयुक्त निवेदन जारी केले. धनुष आणि ऐश्वर्या हे यात्रा आणि लिंग या दोन मुलांचे पालक आहेत आणि ते आपल्या मुलांचे संगोपन करत आहेत.
नयनताराच्या आरोपानंतर धनुष अलीकडेच चर्चेत आला होता. नयनताराने शनिवारी (16 नोव्हेंबर) इंस्टाग्रामवर तीन पानांचे पत्र प्रसिद्ध केले होते, ज्यामध्ये तिने धनुषवर तिच्या नयनतारा: बियॉन्ड द फेयरीटेल या माहितीपटात तिच्या नानुम राउडी धान या चित्रपटातील मजकूर जाणूनबुजून रोखल्याचा आरोप केला होता.
अभिनेत्रीने या पत्रात म्हटले होते की, पडद्यामागील क्लिपसाठी धनुषने तिला 10 कोटी रुपयांची नोटीस पाठवली होती. यामध्ये त्याने असेही म्हटले आहे की हा व्हिडिओ चित्रपटाच्या सेटवर त्याच्या वैयक्तिक उपकरणांसह शूट करण्यात आला होता जो आता या माहितीपटाचा एक भाग आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांनी आयुष शाहच्या आरोपांवर पाठवली कायदेशीर नोटीस, मागितली 10 कोटींची भरपाई
‘मी वेडा होईल नाहीतर कोणाचा तरी खून करेल’; असं का म्हणाले नाना पाटेकर