Thursday, March 13, 2025
Home साऊथ सिनेमा सुपरस्टार धनुष झाला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ पुरस्काराचा मानकरी; भावुक होत लिहिली भली मोठी पोस्ट

सुपरस्टार धनुष झाला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ पुरस्काराचा मानकरी; भावुक होत लिहिली भली मोठी पोस्ट

सोमवारी (22 मार्च) 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली. त्यामध्ये मनोज वाजपेयी आणि दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष यांना ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ हा पुरस्कार देण्यात आला. धनुषला हा मान त्याच्या ‘असुरन’ चित्रपटासाठी मिळाला आहे. आपल्या चाहत्यांसह ट्विटर हँडलवर एक पोस्ट शेअर करून, या अभिनेत्याने पुरस्कार मिळाल्याचा आनंद व्यक्त केला आहे. त्याने त्या सर्व लोकांचे आभार मानले आहेत, ज्यांनी त्याला या टप्प्यावर पोहोचण्यास मदत केली. धनुषने भावुक होत भली मोठी पोस्ट लिहिली आहे.

आपल्या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, “मी सकाळी उठलो आणि मला कळलं की, मला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. मला येथे पोहोचण्यास मदत करणाऱ्या सर्व लोकांचे मी आभार मानू इच्छितो.” धनुष पुढे म्हणाले, “मला राष्ट्रीय पुरस्कार ज्युरीचेही आभार मानायचे आहेत, ज्यांनी माझ्या कामाची चाचणी केली आणि त्यानंतर मला हा सन्मान दिला.”

सह- कलाकारांचे केले अभिनंदन
धनुषने पोस्टद्वारे त्याच्या ‘असुरन’ चित्रपटातील सर्व सह- कलाकारांचे देखील अभिनंदन केले आहे. त्याने लिहिले, “त्यांच्याशिवाय या टप्प्यापर्यंत पोहोचणे अशक्य झाले असते. त्यांनी या चित्रपटात माझ्याबरोबर खूप चांगले काम केले आहे.” धनुषने चित्रपटाच्या निर्मात्यांचे आभार मानले. तो म्हणाला, “त्यांच्याशिवाय हे यश संपादन करणे अवघड होते. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला या चित्रपटासाठी निवडले गेले.”

चाहत्यांसाठी भावनिक संदेश
धनुषने आपल्या चाहत्यांचेही आभार मानले आहेत. भावुक होऊन तो म्हणाला की, “तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याशिवाय मला येथे पोहोचणे कधीच शक्य होणार नाही. इतके प्रेम आणि आपुलकी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार.” याशिवाय धनुषने आपले मित्र, कुटूंबातील सदस्य, मीडिया आणि टीव्हीशी संबंधित व्यक्तींचेही आभार मानले आहेत. तो म्हणाला, “प्रत्येक वळणावर मला साथ दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेही आभार. तुम्ही मला असेच प्रेम देत रहा.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भल्या भल्यांना रडवणाऱ्या कंगना रणौतला ‘या’ कारणामुळे अश्रू अनावर

-कंगना रणौतच्या ‘थलायवी’चा ट्रेलर रिलीज; अभिनेत्रीच्या दणदणीत आवाजाने हबकला प्रेक्षकवर्ग

-प्रसूतीच्या एका महिन्यानंतरच कामावर परतली ‘बेबो!’ ‘पैशांसाठी हे काहीही करतील’ म्हणत नेटकऱ्यांनी केले ट्रोल

हे देखील वाचा