Saturday, May 10, 2025
Home बॉलीवूड जेव्हा ‘रिक्षावाला हिरो व्हायला आलाय’ म्हणत अभिनेता धनुषचा केला होता अपमान, वाचा रंजक किस्सा

जेव्हा ‘रिक्षावाला हिरो व्हायला आलाय’ म्हणत अभिनेता धनुषचा केला होता अपमान, वाचा रंजक किस्सा

तमिळ सुपरस्टार धनुष (Dhanush) हा प्रसिद्ध अभिनेता, गायक, दिग्दर्शक आणि निर्माता आहे. धनुषचे दाक्षिणात्य सिनेसृष्टी आणि बॉलिवूडमध्येही जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. आपल्या दमदार अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर धनुषने हे यश मिळवले आहे. असे असले तरी हा प्रवास करणे मात्र त्याच्यासाठी नक्कीच सोपे नव्हते. सुरुवातीला धनुषला प्रेक्षकांनी आणि सहकलाकारांनी स्वीकारले नाही. वडील कस्तुरी राजा यांच्या थुल्लुवधो इलामाई या चित्रपटातून यशस्वी पदार्पण केल्यानंतरही, धनुषची सेटवर चेष्टा करण्यात आली होती. विविध प्रकारे त्याला अपमानित करण्यात आले होते. याबद्दलचा खुलासा नुकताच धनुषने केला होता. आज २८ जुलै रोजी तो त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर जाणून घेऊया त्याच्या आयुष्यातील काही महत्वाच्या गोष्टी…

विक्रम फेम अभिनेते विजय सेतुपती यांच्याशी २०१५ मध्ये  झालेल्या संभाषणादरम्यान धनुषने त्याच्या मनातील या वेदना बोलून दाखवल्या होत्या.  धनुषने त्या कठीण काळाबद्दल बोलताना  जेव्हा मी कादल कोंडन (2003) चे शूटिंग करत होतो तेव्हा मला विचारण्यात आले होते की हिरो कोण आहे? मी कलाकारांमधील दुसर्‍या कोणाला तरी सूचित केले, कारण मी पुढील अपमानाला सामोरे जाण्यास तयार नव्हतो. तथापि, जेव्हा त्यांना कळले की मी मुख्य अभिनेता आहे, तेव्हा सेटवरील सर्वजण माझ्यावर हसले.

धनुष पुढे म्हणाला की, एक कमेंट माझ्या आयुष्यभर लक्षात राहील, ‘अरे, ऑटो ड्रायव्हरकडे बघ, तो हिरो आहे’. मी माझ्या कारमध्ये बसलो आणि मोठ्याने ओरडलो कारण मी लहान मुलगा होतो आणि तेव्हा मला इतके समजले नाही. असा एकही माणूस नाही ज्याने मला ट्रोल केले नाही आणि माझ्या शरीरावर वक्तव्य केले नाही. मला हे विचार करून आश्चर्य वाटले की ऑटो ड्रायव्हर चित्रपटात हिरो बनू शकत नाही? असेही धनुषने सांगितले.

दरम्यान अभिनेता धनुषने आपल्या दमदार अभिनयाने यशाचे शिखर गाठले आहे. धनुषने चित्रपटसृष्टीत खूप मोठा पल्ला गाठला आहे आणि त्याने आपल्या प्रतिभेने आणि आत्मविश्वासाने स्वतःसाठी एक स्थान निर्माण केले आहे. धनुष लवकरच ‘द ग्रे मॅन’मधून हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हॉलिवूड स्पाय थ्रिलर द ग्रे मॅनचा अ‍ॅक्शन-पॅक्ड ट्रेलर ज्यात रायन गोसलिंग, ख्रिस इव्हान्स, बिली बॉब थॉर्नटन आणि धनुष मुख्य भूमिकेत आहेत.

हे देखील वाचा