Wednesday, July 3, 2024

भारीच ना! धनुषच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीच चाहत्यांना मिळाली ‘गूड न्यूज’

व्यंकटेश प्रभू कस्तुरी राजा म्हणजेच तमिळ सिनेमातील प्रसिद्ध कलाकार धनुष (Dhanush) याचा गुरुवारी २८ जुलै रोजी ३९वा वाढदिवस आहे. चार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकणारा अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, गीतकार आणि पार्श्वगायक धनुषला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. या वाढदिवसापूर्वी धनुषच्या चाहत्यांसाठी दोन आनंदाच्या बातम्या समोर आल्या आहेत. धनुषच्या आगामी ‘नाने वारुवेन’ चित्रपटाचे नवे पोस्टर आणि ‘वाथी’चे फर्स्ट लूक पोस्टर देखील वाढदिवसाच्या एक दिवस आधी बुधवारी (२७ जुलै) रिलीज करण्यात आले आहे. 

‘नाने वरुवेन’मध्ये असेल धमाकेदार भूमिका
चित्रपटाच्या पोस्टरमध्ये धनुष जंगलाच्या मध्यभागी उभा असल्याचे दाखवले आहे आणि त्याच्या एका हातात धनुष्य आणि दुसऱ्या हातात बाण आहेत. या चित्रपटाद्वारे धनुष आणि त्याचा मोठा भाऊ दिग्दर्शक सेल्वाराघवन ही हिट जोडी पुन्हा एकदा कमबॅक करत आहे. (dhanush s birthday naane varuven s new poster release)

पोस्टर झालं रिलीज
या पोस्टरसोबत त्याने लिहिले की, “एका खास व्यक्तीचा खास वाढदिवस. माझ्या प्रिय भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.” धनुष आणि सेल्वाची ही हिट जोडी ‘कादल कोंडेन’, ‘पुधूपेट्टाई’ आणि ‘मायाक्कम येन्ना’ यासह काही प्रसिद्ध तमिळ चित्रपटांसाठी ओळखली जाते. जवळपास एक दशकाच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर दोघे पुन्हा या चित्रपटासाठी एकत्र आले असून, हा त्यांचा पाचवा चित्रपट आहे.

धनुषची भूमिका
‘बीस्ट’ आणि ‘सानिकैधाम’मधून अभिनेता झालेला सेल्वाराघवन देखील ‘नाने वारुवेन’मध्ये भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘नाने वारुवेन’मध्ये धनुष दुहेरी भूमिका साकारताना दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, आतापर्यंत या चित्रपटाबाबत निर्मात्यांनी मौन बाळगले आहे. इंदुजा रविचंद्रन, योगी बाबू, प्रभू गणेशन आणि शैली किशोर हे देखील चित्रपटात मुख्य कलाकार म्हणून दिसणार आहेत. तर युवा शंकर राजा या चित्रपटाला संगीत देत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा