विषये का भाऊंचा! साऊथ सुपरस्टार धनुषने हॉलिवूड सिनेमाच्या प्रीमिअरला मारली ‘मारी’ स्टाईल एन्ट्री

0
138
Dhanush
Photo Courtesy: Twitter/NetflixIndia

‘द ग्रे मॅन’ या चित्रपटाचा नुकताच भारतीय प्रीमियर झाला. रुसो ब्रदर्स दिग्दर्शित चित्रपट पाहण्यासाठी या चित्रपटाची स्टारकास्ट मुंबई प्रीमियरला आली होती. याशिवाय बॉलिवूडचे अनेक स्टार्सही येथे पोहोचले. या प्रीमियरसाठी धनुष खास आऊटफिटमध्ये पोहोचला होता. भारतीय संस्कृती दर्शवणारा शर्ट आणि त्याखाली लुंगी घातली होती. प्रत्येकजण धनुषच्या लूकचे कौतुक करत आहे. सोशल मीडियावर त्याच्या फोटोंची चर्चा आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमात पोहोचलेल्या अनेक सेलिब्रिटींचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

जेव्हा विकी कौशल (vicky kaushal) प्रीमियरला आला, तेव्हा धनुष (Dhanush) त्याला भेटला, दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि खूप गप्पा मारल्या. दुसरीकडे, जॅकलिन, आलिया अतिशय ग्लॅमरस लूकमध्ये पोहोचल्या आणि त्यांचा लूक पाहून सर्व फोटोग्राफर्सच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या.

‘द ग्रे मॅन’ (the gray man) या चित्रपटाबद्दल बोलायचे तर, हा त्याच नावाने लिहिलेल्या कादंबरीवर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटात धनुषसोबत रायन गोसलिंग, ख्रिस इव्हान्स, जेसिका हेनविक, ज्युलिया बटर्स यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

धनुषची मुलं गेली होती लंडनच्या प्रीमियरला
याआधी या चित्रपटाचा प्रीमियर लंडनमध्ये झाला होता, ज्यामध्ये धनुषची मुले लिंगा आणि यात्रा देखील सामील होते. याबाबत माध्यमांशी बोलताना तो म्हणाला होता की, “त्यांना ही मोठी गोष्ट समजली आहे की नाही हे मला माहीत नाही, पण तिथे मजा आली. त्यांना पण खूप मजा आली आणि ते खूप खुश झाले.”

भारतातील प्रतिभावान अभिनेता
यापूर्वी, एका भारतीय अभिनेत्यासोबत काम करण्याबद्दल, चित्रपट निर्माते जो म्हणाले होते की, “आम्हाला भारतीय प्रतिभेबद्दल माहिती आहे. हॉलिवूडच्या बरोबरीने चित्रपट निर्माण करणारा जगात एकच देश आहे आणि तो म्हणजे भारत. भारतात असे अनेक प्रतिभावान अभिनेते आहेत, ज्यांना कॅमेरासमोरचा चांगला अनुभव आहे.”

या प्रीमिअरदरम्यान विकी कौशल, जॅकलिन फर्नांडिस, रणदीप हुड्डा, विशाल भारद्वाज, अलाया फर्निचरवाला, सिद्धार्थ रॉय कपूर, बाबिल खान, किम शर्मा हे देखील कार्यक्रमात पोहोचले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

‘मला नाही राहायचं!’ १३ महिन्यांनंतर ‘इतक्या’ कोटींचं नुकसान सोसत अर्जुनने विकला मलायकाच्या बिल्डिंगमधला फ्लॅट
‘नेक्स्ट टाईम एकदाच सांगेन…’, फोटोग्राफर्सने हद्द पार करताच भडकला साऊथ सुपरस्टार
‘मला लाज नाही वाटत, माझे वडील मुख्यमंत्री असताना मी ४-५…’, रितेशचे रोखठोक विधान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here