Saturday, July 6, 2024

‘मी शांत आहे मात्र आजारी नाही’, म्हणत धर्मेंद्र यांनी स्वतःच केला त्यांच्या तब्येतीबद्दल खुलासा

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते असलेल्या धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमध्ये भरती केल्याच्या बातम्यांनी मोठ्या प्रमाणावर जोर पकडला होता. त्यांना अचानक भरती केल्या गेल्यामुळे त्यांचे फॅन्स आणि शुभचिंतकांमध्ये जरा चिंतेचे वातावरण होते. याबाबत कोणीही नीट माहिती देत नव्हते. मात्र आता खुद्द धर्मेंद्र यांनीच याबद्दल खुलासा केला आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या धर्मेंद्र यांनी त्यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमधून त्यांनी त्यांच्या तब्येतीबद्दल माहिती दिली आहे. या व्हिडिओनंतर सर्वानीच सुटेकचा निश्वास घेतला. शिवाय धर्मेंद्र यांनी या व्हिडिओमधून जे लोकं अशा अफवा पसरवत आहे त्यांच्यावर देखील प्रतिक्रिया दिली.

धर्मेंद्र यांना रुग्णालयात भरती केल्याच्या बातमीनंतर काही तासांनी धर्मेंद्र यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये धर्मेंद्र म्हणतात, “हॅलो मित्रांनो, बी पॉझिटिव्ह जीवन डॆहील पॉझिटिव्ह असले पाहिजे. मी शांत आहे आजारी नाही. काही तक्रार नाही. कोणती ना कोणती हवा सतत उडतच असते. चर्चा होतच राहते. ते माझे एक गाणे होते, ‘बुरा मत सुनो, बुरा मत देखो. एक-दूसरे से प्यार करो और एक-दूसरे की परवाह करो, जिंदगी बहुत ही खूबसूरत है. खूप प्रेम काळजी घ्या.”

हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, “मित्रांनो तुम्हाला खूप प्रेम’. या व्हिडिओवर धर्मेंद्र यांची मुलगी असलेल्या ईशा देओलने कमेंट करत लिहिले, “खूप प्रेम बाबा’, एकाने लिहिले, “तुमच्या या प्रेरणेसाठी खूप खूप धन्यवाद. आम्ही सर्व तुमच्यामुळे सकारात्मक आहोत. सकारात्मक ऊर्जा देवाची एक देण आहे. तुम्ही खूपच चांगले व्यक्ती आहात.” अजून एकाने लिहिले, “आम्ही सर्व तुमच्यावर खूप प्रेम करतो. देव करो आणि तुम्ही कायम आनंदी आणि स्वस्थ राहो.”

धर्मेंद्र यांच्या अद्धि त्यांची मुलं असणाऱ्या सनी आणि बॉबी देओल यांनी वडिलांना रुग्णालयात भरती केल्याच्या बातमीला अफवा सांगितले होते. माझी वडील एकदम स्वस्थ आणि ठीक असल्याचे सनीने एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले होते. धर्मेंद्र यांना मागच्या महिन्यात पाठीत त्रास होत असल्याने रुग्णालयात भरती केले होते. त्यानंतर त्यांना बरे वाटल्यावर ते घरी आले होते. धर्मेंद्र लवकरच करणं जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ सिनेमात काम करताना दिसणार आहे. याशिवाय ते सध्या अपने २ ची शूटिंग करत आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा