Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड हेमा मालिनीसोबतच्या लग्नासाठी धर्मेंद्रने दिली ‘इतकी’ रक्कम? जाणून व्हाल चकित

हेमा मालिनीसोबतच्या लग्नासाठी धर्मेंद्रने दिली ‘इतकी’ रक्कम? जाणून व्हाल चकित

हिंदी सिनेजगतात असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांची जोडी रील लाईफमध्ये खूप हिट होती आणि नंतर त्यांनी एकमेकांना जीवनसाथी बनवण्याचा निर्णय घेतला. अशीच एक उत्तम जोडी म्हणजे, बॉलिवूडचे ‘हिमॅन’ म्हटल्या जाणार्‍या धर्मेंद्र (Dharmendra) आणि सिनेविश्वात ‘ड्रीमगर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेली हेमा मालिनी (Hema Malini). या दोन्ही स्टार्सनी चित्रपटाच्या पडद्यावर खूप धमाल केली आणि एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. त्या काळातील नियतकालिकांमध्ये त्यांच्या अफेअरच्या बातम्या मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे हेमा मालिनी यांनी पत्रकारांना मुलाखती देणेही बंद केले. कारण या बातम्यांमुळे त्यांच्या कौटुंबिक जीवनात अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या होत्या.

वडिलांसोबत करावे लागायचे शूटिंग
या बातम्यांचा परिणाम असा झाला की, हेमा मालिनी यांचे वडील त्यांच्यासोबत शूटिंगसाठी जाऊ लागले. मात्र, त्यापूर्वी ते कधीही त्यांच्यासोबत शूटिंगला गेला नव्हते. पण शूटवर गेल्यावर ते हेमाला तमिळमध्ये धर्मेंद्रपासून दूर राहायला सांगत असत. (dharmendra had given one lakh eleven thousand rupees in mehar to heman malini)

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचा विवाह
अखेर, या दोन कलाकारांचे प्रेम रंगात आले आणि त्यांच्या प्रेमाचा विजय झाला. 21ऑगस्ट1989रोजी दोन्ही कलाकारांनी नाव बदलले आणि लग्न केले. धर्मेंद्र यांनी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट द्यावा लागू नये, म्हणून नाव बदलले. धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांना मेहेर म्हणून पूर्ण एक लाख अकरा हजार रुपये दिले होते.

‘हे’ कलाकार होते हेमांच्या प्रेमात
इतर अनेक अभिनेत्यांनेही हेमा मालिनीसोबत लग्न करण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र, धर्मेंद्रच्या प्रेमापुढे सगळेच मागे राहिले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संजीव कुमार यांनी हेमाच्या घरी लग्नाचे स्थळ पाठवले होते, मात्र हेमाच्या कुटुंबीयांनी त्यांचा प्रस्ताव नाकारला होता. इतकंच नाही, तर अभिनेते जितेंद्रलाही ड्रीम गर्लसोबत लग्न करायचं होतं, असं म्हटलं जातं.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
पत्नीसोबत घटस्फोटानंतर ‘या’ अभिनेत्रीला डेट करतोय हनी सिंग, जाणून घ्या एका क्लीकवर
मुलीचं चित्रपटात काम करणं सुपरस्टार धर्मेंद्रला खटकलं, 6 महिने बोलणंच केलं होतं बंद

हे देखील वाचा